Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadanvis on CM : ‘आता मुख्यमंत्रीपदाची लालसा राहिली नाही…’; देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपद मिळवण्यात रस आहे का, असे विचारले असता त्यांनी  राजकारणात अशा चर्चा होत असतात, त्यामुळे प्रत्येक प्रश्नाला उत्तरे द्यायची नसतात, असे सांगत फडणवीसांनी यावर उत्तर देणे मात्र टाळले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 30, 2024 | 02:59 PM
Devendra Fadanvis on CM : ‘आता मुख्यमंत्रीपदाची लालसा राहिली नाही…’; देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2014 पासून महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाचे नेते अशी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या राजकीय खेळींनी भल्या भल्या अनुभवी राजकारण्यांनाही चितपट केले. पण देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे. मला आता मुख्यमंत्रपदाची लालसा उरलेली नाही. मी पाच वर्षे मुख्यमंत्री होतो, महायुतीकडून आता मला जी जबाबदारी मिळेत ती मी पार पाडेन, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्रीपदावर भाष्य केलं आहे.

“मला आता मुख्यमंत्रपदाची लालसा उरलेली नाही. मी पाच वर्षे मुख्यमंत्री होतो, आतापर्यंत केवळ दोन मुख्यमंत्र्यांनाच  पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला. एक म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरा म्हणजे मी,  त्यामुळे आता मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न किंवा इच्छा माझ्या मनात उरलेली नाही. आता महायुतीकडून मला जी जाबाबदारी देण्यात येईल, त्यात मी काम करेन. महायुतीकडून ज्याला मुख्यमंत्रीपद दिले जाईल, मी त्याच्या पाठिशी ठामपणे उभा राहीन, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

हेही वाचा:  Ajit Pawar Politics: भाजपशी पंगा घेऊन नवाब मलिकांना उमेदवारी; अजित पवार नेमकं काय साध्य करू पाहतायेत?

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपद मिळवण्यात रस आहे का, असे विचारले असता त्यांनी  राजकारणात अशा चर्चा होत असतात, त्यामुळे प्रत्येक प्रश्नाला उत्तरे द्यायची नसतात, असे सांगत फडणवीसांनी यावर उत्तर देणे मात्र टाळले. आर्थिक क्षेत्रात काम करण्याचा मला आवड होती. वकिली माझे स्वप्न होते. पण ते भंगले. त्यामुळे गेल्या २५ वर्षांपसून विधानसभेत जनतेची वकिली करत आहे, असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.

याचवेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही सडकून टीका केली. भाजप हा महायुतीतील सर्वात शक्तिशाली पक्ष आहे, महाविकास आघाडीचे नेते भाजपवर सातत्याने हल्ले करत आहेत. पण महाविकास आघाडीच्या थिंक टँककडून देवेंद्र फडणवीसांवर वैयक्तिक टीका करा, त्यांची प्रतिमा मलिन करा, त्यामुळे भाजप आणि महायुतीची ताकद कमी होईल, असा सल्ला दिल्याचा दावाही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला.

हेही वाचा: कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प, कोण मारणार बाजी? सर्वेक्षणातून आले समोर

विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीनंतर जागा कमी पडल्यास उद्धव ठाकरे की शरद पवार यांपैकी कोणाला सर्वात आधी आमंत्रण देणार, असा प्रश्न विचारला असता, आम्हाला त्यांची गरजच पडणार नाही.  तशी परिस्थितीच उद्भवणार नाही, आणि मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युलाही आम्ही निकालानंतर ठरवू, २३ तारखेची वाट बघा,’ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: I no longer want to be chief minister devendra fadnavis indicative statement nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 02:59 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Mahayuti

संबंधित बातम्या

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या
1

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
2

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ
3

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

नारायण राणेंनी वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे – Sanjay Raut
4

नारायण राणेंनी वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे – Sanjay Raut

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.