Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramdas Athawale : रामदास आठवलेंची महायुतीवर नाराजी! ‘काँग्रेससोबत असताना जागा मिळत होत्या, आता भाजपकडून दुर्लक्ष’

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीतील जागावाटपावरून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेससोबत असताना रिपब्लिकन पक्षाला योग्य प्रतिनिधित्व मिळत होते, मात्र भाजपच्या काळात पक्षाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

  • By विवेक
Updated On: Nov 17, 2026 | 10:24 PM
ramdas athvale

ramdas athvale

Follow Us
Follow Us:
  • रामदास आठवलेंची महायुतीवर उघड नाराजी
  • भाजपच्या काळात रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष?
  • काँग्रेससोबत असताना योग्य प्रतिनिधित्व मिळत असल्याचा दावा
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीमधील मित्रपक्षांच्या नाराजीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महायुतीतील जागावाटपावरून आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. काँग्रेससोबत असताना रिपब्लिकन पक्षाला योग्य जागा मिळत होत्या, मात्र भाजपच्या काळात आमच्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवली. (Ramdas Athawale)

रामदास आठवले यांनी महायुतीतील रिपब्लिकन पक्षाच्या स्थानाबाबत प्रश्न उपस्थित केला. महायुतीमध्ये रिपब्लिकन पक्षालाही योग्य प्रतिनिधित्व मिळायला हवे. आमच्या पक्षाकडेही लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

काँग्रेससोबत असताना पक्षाला निवडणुकीत योग्य जागा मिळत होत्या. मात्र, आता भाजपसोबत असताना पक्षाला अपेक्षित संधी मिळत नसल्याची भावना त्यांनी मांडली. त्यामुळे महायुतीतील मोठ्या पक्षांनी रिपब्लिकन पक्षाच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, असे आठवले यांचे म्हणणे आहे.

Eknath Shinde : अमित शाहांवरील टीकेनंतर एकनाथ शिंदे संतापले, ‘खरा मोठा थापाडा कोण?’ म्हणत उद्धव ठाकरेंना सुनावलं!

विधान परिषदेच्या जागांसाठी आठवले आग्रही

या पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी विधान परिषदेच्या जागांचा मुद्दाही उपस्थित केला. रिपब्लिकन पक्षाला विधान परिषदेच्या काही जागा देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यापूर्वीही आठवले यांनी विधान परिषदेत पक्षाला किमान एक जागा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. शरद पवार यांच्यासोबत असताना रिपब्लिकन पक्षाला विधान परिषदेच्या सात जागा मिळाल्या होत्या. मात्र, 2014 पासून भाजपसोबत असूनही एकही जागा मिळाली नसल्याची खंत त्यांनी यापूर्वी व्यक्त केली होती.

महायुतीतील नाराजी पुन्हा चर्चेत

रामदास आठवले हे सध्या केंद्र सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री आहेत. मात्र, केंद्रात मंत्रिपद असूनही महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्तेत पुरेसा वाटा मिळत नसल्याचा मुद्दा ते सातत्याने मांडत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था, विधान परिषद आणि विविध शासकीय पदांवर पक्षाला संधी मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.
आता आठवलेंनी पुन्हा एकदा उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न चर्चेत आला आहे. भाजप आणि महायुतीतील इतर मित्रपक्ष आठवलेंच्या मागणीवर काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Satej Patil : गोकुळ गाजवलं, आता गोव्याची जबाबदारी! बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठं गिफ्ट, राष्ट्रीय राजकारणात दमदार एन्ट्री?

💡

Frequently Asked Questions

  • Que: रामदास आठवले यांनी महायुतीवर नाराजी का व्यक्त केली?

    Ans: महायुतीमध्ये रिपब्लिकन पक्षाला अपेक्षित जागा आणि सत्तेत प्रतिनिधित्व मिळत नसल्याची खंत रामदास आठवले यांनी व्यक्त केली. भाजपच्या काळात पक्षाकडे दुर्लक्ष होत असल्याचेही ते म्हणाले.

  • Que: रामदास आठवले यांनी महायुतीकडे कोणती मागणी केली आहे?

    Ans: रिपब्लिकन पक्षाला विधान परिषदेच्या काही जागा देण्यात याव्यात आणि सत्तेत योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

  • Que: रामदास आठवले कोणत्या पक्षाचे अध्यक्ष आहेत?

    Ans: रामदास आठवले हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते राज्यसभेचे खासदार आणि केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री आहेत.

Web Title: Ramdas athawale mahayuti displeasure bjp rpi vidhan parishad seats vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 10:24 PM

Topics:  

  • BJP
  • Mahayuti
  • Ramdas Athawale
  • RPI

संबंधित बातम्या

Congress on Ashish Shelar : ‘राहुल गांधींवर बोलण्याआधी SIR समजून घ्या! आशिष शेलारांना SIR चा कारभारच माहिती नाही?’ काँग्रेसची टीका
1

Congress on Ashish Shelar : ‘राहुल गांधींवर बोलण्याआधी SIR समजून घ्या! आशिष शेलारांना SIR चा कारभारच माहिती नाही?’ काँग्रेसची टीका

Jalgaon DCC Bank Election 2026 : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीचा धडाका! गुलाबराव पाटील, गिरीश महाजन बिनविरोध!
2

Jalgaon DCC Bank Election 2026 : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीचा धडाका! गुलाबराव पाटील, गिरीश महाजन बिनविरोध!

एफसी रोडवरील अतिक्रमणावरून भाजप नगरसेवक आक्रमक; महापालिका सभागृहातच आंदोलन
3

एफसी रोडवरील अतिक्रमणावरून भाजप नगरसेवक आक्रमक; महापालिका सभागृहातच आंदोलन

Bharat Summit: ‘भारताला लोकशाही शिकवू नका!’ काँग्रेसच्या कार्यक्रमातील ‘मत चोर’घोषणेवरून इटलीच्या नेत्याने सहकाऱ्याला सुनावले
4

Bharat Summit: ‘भारताला लोकशाही शिकवू नका!’ काँग्रेसच्या कार्यक्रमातील ‘मत चोर’घोषणेवरून इटलीच्या नेत्याने सहकाऱ्याला सुनावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.