Mumbai Politics: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्षांना गळती लागली आहे. माजी आमदार-खासदारांपासून स्थानिक कार्यकर्तेही पक्ष सोडून जाताना दिसत आहेत. या सगळ्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटचे नेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. “आठवेळा निवडणूक जिंकल्यानंतऱ आता थांबायचा विचार करावा, असं वाटत आहे.” असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. इतकेच नव्हेतर , महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेनेतून मला मंत्रीपदाची संधी न मिळाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. संजय राऊत प्रत्येकवेळी मला सावरण्याची भाषा करतात, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजीही व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रीया दिली आहे.
“भास्कर जाधव हे आमचे सहकारी आणि शिवसेनेचे ते प्रमुख नेते आहेत. त्यांचा राजकारणातला अनुभव अत्यंत दांडगा आहे. ते अत्यंत चाणाक्ष नेते असून शिवसेनेच्या वाढीत त्यांचे योगदान मोठेआहे. आम्हा सर्वांसाठी ते प्रिय नेते आहेत. ते बराच काळ त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच कोकणात अतात. पक्षाने त्यांना विश्वासाने अनेक जबाबदाऱ्या दिल्या आणि त्यांनी त्या तितक्याच निष्ठेने पेलवल्या आहेत. जेव्हा भास्कर जाधव मुंबईत येतील, तेव्हा उद्धव ठाकरे स्वत: त्यांच्याशी चर्चा करतील. भास्कर जाधव हाडाचे शिवसैनिक आहेत. त्यांनी कायम शिवसेनेची बाजू आक्रमकपणे लावून धरली, शिवसेनेसाठी लढले. पण त्यांच्या मनात नेमकं काय आहे, त्यांच्या मनात कोणत्या वेदना आहेत? ते आम्ही समजून घेऊ, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
भास्कर जाधव म्हणाले होते की. 2022 साली आमदार फुटून जायला नको होते.असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताा संजय राऊत म्हणाले की, कुणाला वाटतं, आमदार- खासदार फुटून जावेत, कुणालाही वाटत नाही. ते शरद पवार साहेबांचं उदाहरण देतात. ते बरोब आहे. पण तरीही अडीच वर्षांनी अजित पवार ४०-४२ आमदारांना घेऊन गेलेच ना, ज्यांना शेण खायचंय, ज्यांना स्वत:च्या तोंडांत गद्दारीचं शेण भरायचं आहे, ते थांबणार नाहीत. ज्यांना पैशाची आणि सत्तेची चटक लागलेली असते, ते कुणासाठी थांबत नाहीत. ज्यांच्या मागे ईडी,सीबीाआय, पोलिसांचा दबाव असतो. त्यांना कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी ते थांबत नाहीत. उद्धव ठाकरेंनी त्यावेळी सर्वांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या कित्येक बैठकांना मी स्वत: हजर होतो. पण प्रत्येकाची दुखणी वेगळीच होती.
“प्रत्येकाचा आजार वेगळा होता,” असे सांगत ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आणि केंद्र सरकारवर थेट आरोप केले आहेत. त्यांनी माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की, “गुलाबराव पाटलांच्या खात्यात ४० ते ५० कोटी रुपये कुठून तरी जमा झाले होते. त्यामुळे ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते, या भीतीने ते थरथरत होते.”
Eknath Khadase on BJP; भाजपमधले ९० टक्के लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप; खडसेंनी भाजपला पुन्हा आरसा
राऊत पुढे म्हणाले, “मला माहिती आहे, त्यांना विचारा. त्यांच्या बँक खात्यात जी रक्कम जमा झाली, त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि अटक होईल, अशी भीती त्यांना होती. त्यामुळेच ते म्हणाले होते की, ‘मला जावं लागेल’.” “या भ्रष्टाचाराच्या कॅन्सरला तुम्ही काय करणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राऊत यांनी आरोप केला की, “भय आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टींमुळे आमदार आणि खासदार पक्ष सोडून गेले. हे भय आणि भ्रष्टाचार निर्माण करण्याचं काम नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलं.” या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. गुलाबराव पाटील आणि भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.