Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tukaram Munde News: तुकाराम मुंढे यांना पालक सचिवपदावरून तडकाफडकी का हटवले?

Tukaram Mundhe News: पालक सचिवांना विकासकामांचा आढावा घेण्यासाठी वर्षातून चार वेळा, म्हणजेच किमान दर तीन महिन्यांनी एकदा, आपल्या जिल्ह्याला भेट देणे आवश्यक असते. जिल्ह्याच्या विकासासाठी विशिष्ट उपाययोजना सुचवणे आणि त्या उपाययोजनांवर अहवाल सादर करणे हीदेखील त्यांची जबाबदारी असते.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 24, 2026 | 01:21 PM
मुंढेंच्या बदलीसाठी २५० कोटींची सुपारी

मुंढेंच्या बदलीसाठी २५० कोटींची सुपारी

Follow Us
Follow Us:
  • आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदावरून हटवण्यात आले
  • तुकाराम मुंढे मंत्रालयात (राज्य सचिवालयात) सचिव असताना २३ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती
  • नवीन जबाबदारी स्वीकारणारे डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे सध्या राज्याच्या ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.
Tukaram Munde Transfer: अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून तुकाराम मुंडे यांच्या कामगिरीचे कौतुकच होत आहे. पण त्याच वेळी त्यांच्या कार्यपद्धतीला विरोध करणाऱ्यांचीही कमी नसते. अशातच आयएएस तुकाराम मुंढे यांच्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंढे यांना परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदावरून हटवण्यात आले आहे.   मुंढे यांच्या जागी आता डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची परभणीचे पालक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत असताना, २३ फेब्रुवारी २०२६ रोजी तुकाराम मुंडे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती.

तुकाराम मुंडे मंत्रालयात (राज्य सचिवालयात) सचिव असताना त्यांची परभणी जिल्ह्याचे पालक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता ते सचिव नसल्यामुळे पालक सचिवांची जबाबदारी दुसऱ्या अधिकाऱ्याकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार ही जबाबदारी स्वीकारणार असून, ते सध्या राज्याच्या ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाचे सचिव आहेत.

Mumbai News: कपातील चहाचा रंग कृत्रिम! एफडीएच्या कारवाईत ९०० किलो चहा, १७ किलो रंग जप्त; गुन्हा दाखल

पालक सचिव म्हणजे काय?

एखाद्या विशिष्ट जिल्ह्याचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी सरकार एका वरिष्ठ अधिकाऱ्याची पालक सचिव म्हणून नियुक्ती करते. हे एक महत्त्वाचे पद मानले जाते. पालक सचिव हे जिल्ह्यातील शासकीय धोरणात्मक निर्णय आणि कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जबाबदार असतात.

पालक सचिवांना विकासकामांचा आढावा घेण्यासाठी वर्षातून चार वेळा, म्हणजेच किमान दर तीन महिन्यांनी एकदा, आपल्या जिल्ह्याला भेट देणे आवश्यक असते. जिल्ह्याच्या विकासासाठी विशिष्ट उपाययोजना सुचवणे आणि त्या उपाययोजनांवर अहवाल सादर करणे हीदेखील त्यांची जबाबदारी असते.

क्रॉफर्ड मार्केटमध्ये एफडीएची कारवाई! दिशाभूल करणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांचा साठ जप्त; कांदिवलीतही टाकली धाड

तुकाराम मुंडे यांची जलद कारवाई

एफडीए आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून गतिमान आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंडे यांनी अनेक कठोर कारवाया केल्या आहेत. राज्यभरातील विविध ठिकाणी छापे टाकून त्यांनी भेसळीची अनेक प्रकरणे उघडकीस आणली. इतकेच नव्हे तर या प्रकरणांमध्ये सामील असलेल्या अनेकांवर गुन्हे दाखल केले. परिणामी, राज्यभरातील भेसळीत सामील असलेले व्यापारी आणि मध्यस्थ दहशतीच्या छायेत आहेत.

राज्यभरातून तुकाराम मुंडे यांच्या कारवाईचे कौतुक करत आहे. या कठोर कारवाईमुळे ते व्यापाऱ्यांच्या दबावाला बळी पडणार नाहीत आणि अन्न व औषध प्रशासनातून त्यांची बदली होणार नाही, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.

 

 

Web Title: Ias tukaram mundhe replaced by chandrakant pulkundwar as parbhani guardian secretary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • FDA
  • Parbhani
  • Tukaram Munde

संबंधित बातम्या

पनीरच्या नावावरून देशभर चर्चा; FSSAIचा प्रस्ताव अन् तुकाराम मुंढेंच्या कारवाईला श्रेय देण्याची सोशल मीडियावर चढाओढ
1

पनीरच्या नावावरून देशभर चर्चा; FSSAIचा प्रस्ताव अन् तुकाराम मुंढेंच्या कारवाईला श्रेय देण्याची सोशल मीडियावर चढाओढ

FDA ची पुन्हा धडक कारवाई; चक्क लक्झरी बस थांबवून मिठाईसाठी नेण्यात येणारा 16 लाखांचा खवा जप्त
2

FDA ची पुन्हा धडक कारवाई; चक्क लक्झरी बस थांबवून मिठाईसाठी नेण्यात येणारा 16 लाखांचा खवा जप्त

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार
3

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
4

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.