Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गांधी मैदान कोल्हापूरची अस्मिता, मैदानाचा प्रश्न मार्गी लावू : राजेश क्षीरसागर

ऐतिहासिक गांधी मैदान फक्त शिवाजी पेठेची अस्मिता नसून कोल्हापूरची अस्मिता आहे. कोल्हापुरातील अनेक नामवंत खेळाडू या मैदानात घडले असून, या मैदानाची दुरावस्था होण्याची मूळ कारणे शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी दोन स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 28, 2022 | 02:50 PM
गांधी मैदान कोल्हापूरची अस्मिता, मैदानाचा प्रश्न मार्गी लावू : राजेश क्षीरसागर
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : ऐतिहासिक गांधी मैदान (Gandhi Maidan) फक्त शिवाजी पेठेची अस्मिता नसून कोल्हापूरची अस्मिता आहे. कोल्हापुरातील अनेक नामवंत खेळाडू या मैदानात घडले असून, या मैदानाची दुरावस्था होण्याची मूळ कारणे शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी दोन स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. यासाठी सुमारे २५ कोटींचा निधी अपेक्षित असून, येत्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) माध्यमातून या मैदानाच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी विशेष निधी मंजूर करून हा प्रश्न कायमचा मार्गी लावू, असे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

गांधी मैदानाची दुरावस्था आणि आवश्यक उपाययोजना याबाबात श्री शिवाजी तरूण मंडळाच्या वतीने शिवाजी मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्री शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी सांगितले की, गेले अनेक वर्षे या मैदानाची दुरावस्था झाली आहे. याबाबत शिवाजी पेठेतील नागरिकांकडून वारंवार मागणी होत आहे. या मैदानास निधी मंजूर व्हावा आणि मैदानाचा वापर पूर्ववत खेळासाठी व्हावा, अशी सर्वांची इच्छा आहे. गांधी मैदानासह शिवाजी पेठेतील इतर महत्वाची विकासकामे आणि प्रश्न क्षीरसागर यांनी मार्गी लावावीत, अशी मागणी करत श्रेयवाद करण्यापेक्षा शिवाजी पेठेतील प्रत्त्येक नागरिकाने शिवाजी पेठ म्हणजे मी असा विचार करून शिवाजी पेठेचा लौकिक वाढवावा, असे सांगितले.

राजेश क्षीरसागर म्हणाले, निवडणुकांपुरते काम करण्याची आपली कार्यपद्धती नाही. शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून, नागरिकांना सोयीसुविधा मिळवून देणे हे कर्तव्य समजतो. शिवाजी पेठेतील नागरिक कायम माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मागे ठाम उभे आहेत. त्यामुळे या पेठेतील नागरिकांचे आणि माझं जिव्हाळ्याच नातं निर्माण झालं आहे. यापूर्वी रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी नगरविकास विभागाकडून १५ कोटी आणि पर्यटन विभागाकडून ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

Web Title: Identity of gandhi maidan kolhapur lets solve the maidan issue says rajesh kshirsagar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2022 | 02:50 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • kolhapur
  • maharashtra
  • Rajesh Kshirsagar

संबंधित बातम्या

मोखाड्यात अवैधपणे मद्य वाहतूक करणारी कार पोलिसांच्या ताब्यात, 6.15 लाख रुपयांचा मद्य साठा जप्त
1

मोखाड्यात अवैधपणे मद्य वाहतूक करणारी कार पोलिसांच्या ताब्यात, 6.15 लाख रुपयांचा मद्य साठा जप्त

मोठी बातमी! ठाकरे बंधूंची भेट अन् एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुंबई जिंकण्यासाठी आखली ‘ही’ खास रणनीती
2

मोठी बातमी! ठाकरे बंधूंची भेट अन् एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुंबई जिंकण्यासाठी आखली ‘ही’ खास रणनीती

Pali Mayor Election : पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता यांचा विजय, शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव
3

Pali Mayor Election : पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता यांचा विजय, शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव

दहिसर टोल नाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून अखेर सुटका! उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब
4

दहिसर टोल नाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून अखेर सुटका! उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.