Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अमेरिकेने व्यापार युद्ध सुरू केल्यास त्याचा महाराष्ट्रावर मोठा परिणाम होईल’; माजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली भीती

जर सरकारने कापूस आणि सोयाबीनला समर्थन किंमत दिली असती, तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नव्हती. मात्र, इतर कोणत्याही गोष्टींच्या किमतीने न वाढवता सरकार शेतकऱ्यांवरच अन्याय करत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 01, 2025 | 03:02 PM
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील अराजकतेला मुख्यमंत्री जबाबदार; माजी मुख्यमंत्र्यांनी केली टीका

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील अराजकतेला मुख्यमंत्री जबाबदार; माजी मुख्यमंत्र्यांनी केली टीका

Follow Us
Close
Follow Us:

कराड : देशात किंबहुना महाराष्ट्रात सध्या अस्थिर परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीत दिलेली आश्वासनपूर्ती झाली नाही. राज्याला जीएसटीचा परतावा मिळाला नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारली, लाडकी बहीण योजनेचे हप्ते द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत. याउलट राज्यात जातीय दंगली घडवून अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सगळे केंद्र सरकारच्या आश्रयाने चालले असून या सर्व परिस्थितीला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि महायुतीने दिलेल्या आश्वासनांची पूर्ती होईल, अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र, त्यांची घोर निराशा झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नसल्याचे सांगत दोन दिवसात (दि.३१) सर्व कर्ज भरावे, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी याला जोरात दिला. जर सरकारने कापूस आणि सोयाबीनला समर्थन किंमत दिली असती, तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नव्हती. मात्र, इतर कोणत्याही गोष्टींच्या किमतीने न वाढवता सरकार शेतकऱ्यांवरच अन्याय करत आहे. राज्य सरकारही केंद्र सरकारच्या पावलांवर पाऊल टाकत आहे, या गोष्टींचा काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांनी जाहीर निषेध नोंदवला.

ते म्हणाले, शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारर्माफत मिळणारा किसान सन्मान निधी एक हजारावरून दीड हजार करण्याचे भाजपने सांगितले, हे झाले नाही. शेतमालाला किमान हमीभाव मिळाला नाही. लाडकी बहीण योजनेच्या पंधराशेवरून एकवीसशे रुपयांच्या आश्वासनपूर्तीला हरताळ फासला. राज्यावर चाळीस हजार कोटींचे कर्ज असल्याचे महायुतीचे मंत्री शंभूराज देसाई सांगतात. मग योजना जाहीर करताना हे माहीत नव्हते का? असा सवाल उपस्थित करत सरकारने लोकांना फसवले. आता जनताच त्यांचा विचार करेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

ट्रम्प सरकारच्या दबावाला केंद्र सरकार बळी

ट्रम्प सरकारच्या दबावाला केंद्र सरकार बळी पडल्याचे सांगताना चव्हाण म्हणाले, अमेरिकेमध्ये अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या ६० लाख लोकांना त्यांनी परत पाठवले. त्यांचा सन्मान राखला नाही. याबाबतच्या धोरणावेळी केंद्र सरकारने त्यांच्यासमोर लोटांगण घातले. आता दोन एप्रिल रोजी ट्रम्प सरकार अमेरिकेचे आयात-निर्यात धोरण ठरवणार आहे. यावेळी केंद्र सरकारने ताठर भूमिका घ्यायला हवी. जर यावेळीही केंद्राने त्यांच्यासमोर लोटांगण घातले, तर शेतकऱ्यांची प्रचंड अनास्था होईल. याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. अमेरिकेने व्यापार युद्ध सुरू केल्यास त्याचा महाराष्ट्र सरकारवर मोठा परिणाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: If america starts a trade war it will have a big impact on maharashtra says former cm prithviraj chavan nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 03:02 PM

Topics:  

  • former Chief Minister Prithviraj Chavan
  • India UAE Trade
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: वरिष्ठ नेत्यांच्या मनधरणीला यश; ‘या’ जिल्ह्यात १६१ उमेदवारांची माघार
1

Maharashtra Politics: वरिष्ठ नेत्यांच्या मनधरणीला यश; ‘या’ जिल्ह्यात १६१ उमेदवारांची माघार

‘भाजपच्या पक्ष नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित कराल तर…’; लहू बालवडकरांचा अमोल बालवडकरांना इशारा
2

‘भाजपच्या पक्ष नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित कराल तर…’; लहू बालवडकरांचा अमोल बालवडकरांना इशारा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी देव पाण्यात! तिर्थक्षेत्र गाठून देवाला साकडे, उमेवारांनी जिंकण्यासाठी केली जोरदार मोर्चेबांधणी 
3

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी देव पाण्यात! तिर्थक्षेत्र गाठून देवाला साकडे, उमेवारांनी जिंकण्यासाठी केली जोरदार मोर्चेबांधणी 

Maharashtra Politics: उपनगराध्यक्ष आणि सभापतीपदासाठी रस्सीखेच सुरू, कुठे सुरू आहे स्पर्धा?
4

Maharashtra Politics: उपनगराध्यक्ष आणि सभापतीपदासाठी रस्सीखेच सुरू, कुठे सुरू आहे स्पर्धा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.