Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट

Maharashtra Breaking: IMD च्या मते, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांसाठी पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. २ आणि ३ जुलै रोजी या भागांत मुसळधार पावसाची दाट शक्यता असून, ४ ते ६ जुलै दरम्यान पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 03, 2026 | 10:00 AM
LIVE
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Follow Us:
  • 03 Jul 2026 10:00 AM (IST)

    03 Jul 2026 10:00 AM (IST)

    गिफ्ट निफ्टीची मजबूत कामगिरी; आज शेअर बाजारात तेजीची शक्यता

    जागतिक बाजारातील संमिश्र कल पाहता, आज ३ जुलै रोजी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, तेजीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास १५१ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, २४,४१६ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

  • 03 Jul 2026 09:50 AM (IST)

    03 Jul 2026 09:50 AM (IST)

    तिन्ही मार्गावरील लोकल उशिराने

    मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. आज, गुरुवारी देखील मुंबईत पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवलीसह अनेक भागांत पावसाचा जोर वाढला आहे. तसेच नवी मुंबईत देखील पावसाची बॅटिंग सुरु आहे. याशिवाय, वाढत्या पावसाचा परिणाम रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूक उशीराने सुरु आहे. तसेच, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने आणि पावसामुळे दृष्टमानता कमी झाल्याने रस्ते वाहतूक देखील मंदावली आहे.

  • 03 Jul 2026 09:40 AM (IST)

    03 Jul 2026 09:40 AM (IST)

    देशभरातील अनेक भागांत पावसाचा हाहा:कार

    गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यातच नैऋत्य मान्सूनने पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये तीव्र उष्णतेपासून दिलासा दिला आहे. डोंगराळ भागांमध्ये मात्र हाहा:कार उडाला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये ढगफुटी झाली असून, त्यामुळे पूर आल्याचे पाहिला मिळत आहे. तर उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्ग अनेक तासांपासून बंद आहे. त्यामुळे हजारो यात्रेकरू अडकून पडले.

  • 03 Jul 2026 09:30 AM (IST)

    03 Jul 2026 09:30 AM (IST)

    Crime News:  चौथ्या लग्नासाठी पत्नीनेच रचला पतीच्या हत्येचा कट 

    Madhya Pradesh Murder: आयुष्यात सर्व काही सुख-सोयी असूनही केवळ समाधानाच्या अभावामुळे आणि सततच्या अतृप्ततेतून गुन्हेगारी प्रवृत्ती कशी बळावते, याचे एक धक्कादायक आणि विवाहाच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे प्रकरण समोर आले आहे. येथील एका महिलेने आपल्या चौथ्या लग्नाचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रियकराच्या मदतीने तिसऱ्या पतीची निर्घृण हत्या केल्याचा खळबळजनक आरोप आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित महिला, तिचा प्रियकर आणि त्यांना मदत करणाऱ्या एका अन्य साथीदाराला अटक केली आहे.

  • 03 Jul 2026 09:25 AM (IST)

    03 Jul 2026 09:25 AM (IST)

    Gold Price Hike : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ; ग्राहकांची चिंता वाढली 

    नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वाढते भाव आणि डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत चाललेल्या रुपयामुळे देशभरात सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून, आज ३ जुलै रोजी राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४३,९४० रुपयांवर पोहोचला आहे. याआधीच्या दिवशी दिल्लीच्या सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्ध सोन्याच्या दरात तब्बल ३,००० रुपयांची मोठी वाढ होऊन तो प्रति १० ग्रॅमसाठी १,४७,५०० रुपयांवर पोहोचला होता. जागतिक बाजारात 'स्पॉट गोल्ड'चा भाव प्रति औंस ४,१४४.८३ डॉलर्स इतका वाढल्याने स्थानिक बाजारातही सोन्याची मागणी आणि दर कमालीचे वधारले आहेत; मात्र सोन्याच्या या गगनाला भिडणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले असून, खरेदीचा प्लॅन पुढे ढकलण्याची चिंता त्यांना सतावत आहे.

  • 03 Jul 2026 09:15 AM (IST)

    03 Jul 2026 09:15 AM (IST)

    Ketan Agrawal Murder Case: सिया आणि चेतन चौधरीला आज वडगाव मावळ न्यायालयात हजर करणार

    Ketan Agrawal Murder Case: येथील उद्योजक केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी संपत असल्याने, आज दुपारी अडीच वाजेनंतर त्यांना वडगाव मावळ न्यायालयात हजर केले जाणार आहे. न्यायाधीश ए.एम. विभूते यांच्या समोर ही महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार असून, गेल्या पाच दिवसांच्या कोठडीत पोलिसांनी केलेल्या कसून तपासात हाती लागलेले महत्त्वाचे धागेदोरे आणि पुरावे न्यायालयात सादर केले जातील.

  • 03 Jul 2026 09:10 AM (IST)

    03 Jul 2026 09:10 AM (IST)

    Share Market Today: गिफ्ट निफ्टीची मजबूत कामगिरी

    India Share Market Update: जागतिक बाजारातील संमिश्र कल पाहता, आज ३ जुलै रोजी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, तेजीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास १५१ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, २४,४१६ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

Maharashtra to National And International Breaking News:

 

मुंबई: जुलैच्या सुरुवातीलाच राज्यात मान्सूनने जोरदार पुनरागमन केले आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशसह राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रापासून उत्तर केरळच्या किनारपट्टीपर्यंत पसरलेला एक तीव्र कमी दाबाचा पट्टा (ट्रफ) सक्रिय झाला आहे. याच्या प्रभावामुळे, ६ जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

वाचा सविस्तर- 

 

 

Web Title: 3 july 2026 live breaking news marathi maharashtra politics national international politics crime sports monsoon alert economics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News: पुणे रेल्वे स्थानकावर ‘हमाली’ महागली! जादा पैसे मागितल्यावर कुलींवर होणार कारवाई
1

Pune News: पुणे रेल्वे स्थानकावर ‘हमाली’ महागली! जादा पैसे मागितल्यावर कुलींवर होणार कारवाई

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी
2

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी

चेंबुर दुर्घटनेनंतर शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव ॲक्शन मोडमध्ये; वडाळ्यात पावसाळी कामांचा घेतला आढावा
3

चेंबुर दुर्घटनेनंतर शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव ॲक्शन मोडमध्ये; वडाळ्यात पावसाळी कामांचा घेतला आढावा

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
4

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.