Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या 'ऑपरेशन टायगर' आणि फडणवीसांवरील टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्कील शैलीत उत्तर दिले. २०१९ च्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देत त्यांनी, "प्रेमभंगानंतर आम्ही दुसरं लग्न केलं, आता पुन्हा प्रेम जुळणं कठीण आहे," असे म्हटले.

  • By विवेक
Updated On: Jul 02, 2026 | 09:58 PM
'जो राम का नहीं, वो किसी काम का नहीं'; उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांचा टोला

'जो राम का नहीं, वो किसी काम का नहीं'; उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांचा टोला

Follow Us
Follow Us:

राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी ‘ऑपरेशन टायगर’ संदर्भातील चर्चेला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांच्यावर मिश्कील शब्दांत टीका केली.

‘मित्र पक्षाचं ऑपरेशन मी का थांबवू?’

मुलाखतीत फडणवीस यांना, “उद्धव ठाकरे यांना वाटत होतं की तुम्ही ऑपरेशन टायगर थांबवावं, पण तुम्ही ते केलं नाही,” असा प्रश्न विचारण्यात आला.

यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरेंचं वक्तव्य ऐकून माझंही मनोरंजन झालं. समजा माझा मित्र पक्ष एखादं राजकीय ऑपरेशन करत असेल, तर मी ते का थांबवू? आमच्यात आता असं काय प्रेम उरलं आहे? जे आज माझ्यासोबत दिवसरात्र आहेत, त्यांना सोडून ज्यांनी साथ द्यायची वेळ आली तेव्हा आम्हाला सोडलं, त्यांच्यासाठी मी का ऑपरेशन थांबवू?”

ते पुढे म्हणाले, “राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रश्न त्यांचा आहे, माझा नाही. माझं राजकीय अस्तित्व कसं टिकवायचं, हे मला माहिती आहे.”

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला’

उद्धव ठाकरे यांनी “राज्यात ऑपरेशन टायगर नव्हे, ऑपरेशन फडणवीस सुरू आहे. फडणवीसांचे पंख छाटले जात आहेत,” अशी टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंदी चित्रपटातील एका गाण्याचा उल्लेख करत मिश्कील टिप्पणी केली.

“हिंदीत एक गाणं आहे… ‘माना के तेरे जहां में ये नहीं कि प्यार नहीं मिलता, वो जब चाहिए तब नहीं मिलता.’ हे प्रेम मला २०१९ मध्ये हवं होतं. तेव्हा प्रेमभंग झाला. आता पुन्हा प्रेम जुळणं कठीण आहे. प्रेमभंगानंतर आम्ही दुसरं लग्न केलं, संसार थाटला, आमच्या लग्नाचे वाढदिवसही झाले. आता त्यात काय उरलं?” असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis News: ‘त्या’ खासदारांना भाजपमध्ये यायचे होते, पण आम्ही दारे बंद ठेवली; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील सत्ताधारी महायुती आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २०१९ मधील भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर बदललेल्या राजकीय समीकरणांचा संदर्भ देत फडणवीस यांनी ही टिप्पणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Web Title: Devendra fadnavis on uddhav thackeray operation tiger reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 09:58 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Politics
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Shiv Sena Candidates: जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण
1

Shiv Sena Candidates: जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण

Thackeray Brothers Morcha: हुकूमशाहाचा पहिला पराभव महाराष्ट्रातून; ठाकरे बंधूंची  ज्ञानेश कुमारांच्या हकालपट्टीची मागणी
2

Thackeray Brothers Morcha: हुकूमशाहाचा पहिला पराभव महाराष्ट्रातून; ठाकरे बंधूंची ज्ञानेश कुमारांच्या हकालपट्टीची मागणी

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल
3

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल

Uddhav Thackeray : ‘उद्या रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल,’ उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा, गर्जना मोर्चातून घणाघात
4

Uddhav Thackeray : ‘उद्या रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल,’ उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा, गर्जना मोर्चातून घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.