दहा दिवसाचं राजकीय नाट्य अखेर संपल असून राज्याला नवे मुख्यमंत्री मिळाले आहे. मात्र यामुळे महाविकास आघाडीला चांगलाच धक्का बसला आहे. शिवसेनेचेच (Shivsena) आमदारांनी बंड पुकारल्यामुळे पक्षात फूट पडली त्यामुळे आता इथून पुढे जर शिवसेनेत राहायच असेल तर आता शिवसैनिकांना एकनिष्ठतेचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. नुकतीचं याबाबतची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
[read_also content=”इराण, कतार, चीनसह यूऐईमध्ये भुकंप; तीन जणांचा मृत्यू, आठ जखमी https://www.navarashtra.com/world/earthquakes-in-the-uae-including-iran-qatar-china-three-killed-eight-injured-nrps-299593.html”]
शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली आहे. शिवसेनेच्या एका मोठ्या आमदारांच्या गटाने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यामुळे आता शिवसेनेकडून सावध पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसैनिकांना एकनिष्ठतेचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. शिवसैनिक, पदाधिकारी, नगरसेवक आणि आमदारांसाठी ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे.
[read_also content=”उदयपूरचे हत्या दहशतवादी कृत्य नाही ठरवणे घाईचे; राजस्थान एटीएस https://www.navarashtra.com/india/hurry-to-decide-udaipur-murder-is-not-a-terrorist-act-say-rajasthan-ats-nrgm-299606.html”]