Covid 19 News : आयसर (IISER)पुणे येथील संशोधकांनी एक नवी पद्धत विकसित केली आहे, ज्यामुळे कोविड किंवा झिका विषाणूंच्या नमुन्यांमधून अवघ्या २० मिनिटांत संसर्ग आहे की नाही, हे रंग बदलाच्या माध्यमातून ओळखता येते. विशेष म्हणजे, यासाठी प्रयोगशाळेची गरज भासत नाही.संशोधकांनी सांगितले की ही चाचणी विशेषतः अशा भागांमध्ये तातडीने वापरता येऊ शकते, जिथे प्रयोगशाळा, तांत्रिक कर्मचारी किंवा आवश्यक उपकरणांची कमतरता असते.
आरटी– पीसीआर ची मर्यादा लक्षात घेऊन नवकल्पना
कोविड काळात मोठ्या प्रमाणावर आरटी– पीसीआर चाचण्यांचा वापर झाला. मात्र, त्या चाचण्या महाग आणि वेळखाऊ होत्या, तसेच त्या केंद्रिय प्रयोगशाळांमध्येच उपलब्ध होत्या. त्यामुळे ग्रामीण भागात किंवा संसाधन कमी असलेल्या भागात वेळेवर निदान करणे कठीण झाले होते.याबाबत आयसरचे वैज्ञानिक डॉ. चैतन्य अथले म्हणाले, “आरटी– पीसीआर मशीन महागडी आणि केंद्रित प्रयोगशाळांपुरती मर्यादित होती. त्यामुळे आम्ही कमी खर्चाची आणि लवकर निदान करणारी चाचणी विकसित करण्याची गरज जाणली.”
बायोसेंसर आणि आएनए विश्लेषण
ही नवी चाचणी आएनए आधारित आहे. कोरोना, झिका, इबोला हे आएनए विषाणू असतात. आयसर टीमने आएनए चे विश्लेषण करणारे ‘बायोसेंसर’ विकसित केले आहेत. या बायोसेंसरमध्ये जब विषाणूचा नमुना मिसळला जातो, तेव्हा रंग बदलतो. ही क्रिया उघड्या डोळ्यांनीही दिसू शकते. या प्रक्रियेसाठी केवळ २० मिनिटे लागतात आणि ती फारशी तांत्रिक नसते. पीसीआर टेस्टपेक्षा ही सोपी असून, थोड्याशा प्रशिक्षणाने कुणीही ती करू शकतो.
कॅनडा व ब्राझीलमध्येही यशस्वी प्रयोग
या चाचणीचा वापर झिकासाठी आधी कनडामध्ये झाला असून ब्राझीलमध्येही त्याचे फील्ड टेस्ट करण्यात आले. पुणे आणि चिली येथील वैज्ञानिकांनी मिळून या संशोधनावर काम केले.
कोविड अजूनही चिंतेचा विषय?
– जानेवारीपासून आतापर्यंत महाराष्ट्रात १,९०० पेक्षा अधिक कोविड रुग्ण सापडले आहेत. – यातील ७०% रुग्ण बरे झाले असून १,३६२ रुग्णांनी कोरोवर मात केली आहे. – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वृद्ध नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.