Indrayani river bridge collapsed: “मावळच्या कुंडमळानजीक इंद्रायणी नदीवरील जीर्ण पादचारी पूल कोसळण्याच्या दुर्घटनेत काही पर्यटक वाहून गेल्याची, जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे, हे अतिशय खेदजनक आहे. उपस्थित पर्यटक, स्थानिक ग्रामस्थ, पोलीस यंत्रणा व NDRF तर्फे बचावकार्य सुरु आहे, त्याद्वारे अनेकांना वाचविण्यात यश यावं तसंच जखमींना यथायोग्य उपचार मिळोत, अशी प्रार्थना करतो. ह्या दुर्घटनेत ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व त्यांच्या कुटूंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो. ह्या नदीचं पात्र विस्तीर्ण आहे, तिथल्या खडकाळ भागात विवरं आहेत आणि एरव्ही असणारा वेगवान प्रवाह सद्याच्या दृश्यांमध्ये कमी पाहायला मिळतोय, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी आता शासन, प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
“पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पुल कोसळला. यामुळे पुलावरील काही नागरीक वाहून गेल्याची भीती आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून हे सर्व नागरीक सुरक्षित असावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. या घटनेबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांच्याशी माझे बोलणे झाले असून ते आवश्यक ती सर्व मदत पाठवत आहेत. माझी नागरीकांना नम्र विनंती आहे की कृपया पावसाळी पर्यटनासाठी जाताना कृपया आवश्यक ती काळजी घ्यावी. सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे”, असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
Todays Gold-Silver Price: आनंदाची बातमी! सोन्या – चांदीच्या किंमतीत झाली घसरण, काय आहेत आजचे भाव?
“मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील हा जो पूल आहे तो पुल शेतकऱ्यांना येण्यासाठी आणि जाण्यासाठी बांधण्यात आलेला होता. आज या ठिकाणी पर्यटक आणि दुचाकी वाहनांसह गर्दी झाल्यामुळे हा पूल कोसळला. एकाचवेळी १०० ते १५० लोक एकत्र जमा झाल्यामुळे हा पुल कोसळला आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि एनडीआरएफची टीम पूर्ण सहकार्य करत आहेत. या पुलाची आम्ही वेळोवेळी दुरुस्ती करत होतो. पण या पुलावर दुचाकीस्वरांना प्रवेश नाकारत होतो. पण तरीही काही लोक दुचारीवरून या पुलावरून जात होते. खरं तर अशी दुर्घटना होणं हे दुर्देवी आहे”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.
बोरिवली–ठाणे दुहेरी भुयारी रस्ता प्रकल्पाला वेग; प्रकल्पासाठी बाधित कुटुंबियांना MMRDA चे तीन पर्याय
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पुल कोसळल्याच्या घटनेवर बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, “या ठिकाणी एनडीआरएफची टीम, पोलीस प्रशासनासह येथील स्थानिक ग्रामस्थ देखील मदत करत आहेत. आताच एका व्यक्तीला येथील वाचवण्यास यश आलं आहे. त्यामुळे आपण प्रार्थना करूयात की सर्वजण सुखरुप असावेत”, असं रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.