File Photo : Rain
Maharashtra Rain Updates : रज्यात सर्वत्र आज विजयादशमीचा सण साजरा केला जात आहे. संपूर्ण राज्यातील वातावरण पूर्णपणे आनंदी आहे. नवरात्रीच्या शेवटच्या दिवसांत पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आज देखील विजयादशमीच्या दिवशी राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कोकण, मुंबईसह तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा या राज्यात आज हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हेदेखील वाचा-राजकीय टीकांचे सीमोल्लंघन; ठाकरे, शिंदे, मुंडे, जरांगे यांची तुफान टोलेबाजी
आज विजयादशमीच्या दिवशी राजकीय नेत्यांचे दसरा मेळावे आयोजित केले जातात. त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मराठा आरक्षणाचे प्रमुख मनोज जरांगे आज दसारा मेळावा घेणार आहेत. या नेत्यांच्या दसरा मेळाव्याची तयारी देखील सुरु झाली आहे. मात्र या मेळाव्यावर पावसाचे सावट आहे. पावसाने हजेरी लावली तर दसरा मेळावे होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (फोटो सौजन्य – istockphoto)
हावामान विभागाने 16 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 10 राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये आज 12 ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आज या राज्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, गोवा आणि गुजरात भागात उद्या 13 ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये आज 12 ऑक्टोबर रोजी आणि उद्या 13 ऑक्टोबर पावसाची शक्यता आहे.
हेदेखील वाचा-मोठी बातमी! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून बालाजी मंदिर हटवले; नेमके प्रकरण काय?
कोकण, गोवा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
महाराष्ट्र आणि दसऱ्याचं एक खास नातं आहे. कारण या दिवशी या राज्यातील राजकीय नेत्यांच्या दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. आज देखील राज्यात माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मराठा आरक्षणाचे प्रमुख मनोज जरांगे यांच्या दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. पण त्यांच्या या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट पसरलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आज माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आज दसरा मेळावा घेणार आहेत. पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा मराठवाड्यात आयोजित करण्यात आला आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत नागपूरमध्ये दसरा मेळावा घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात मेळावा होणार आहे.