Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Heat Wave Alert: काम असेल तरच घराबाहेर पडा; राज्यात उन्हाचा जाळ, पुढील काही दिवस…

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने मानक कार्यपद्धती (एसओपी) जारी केली आहे. विशेषतः बांधकाम, शेती व इतर मैदानी काम करणाऱ्या कामगारांसाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 15, 2026 | 08:28 PM
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा बळी; शेतात काम करताना शेतकऱ्याचा मृत्यू

लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा बळी; शेतात काम करताना शेतकऱ्याचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

नागरिकांसाठी सरकारने जारी केली ‘एसओपी’
दोन दिवस उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याचा इशारा
नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

पुणे: राज्याच्या बहुतांश भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असताना (Pune) पुण्यातही तापमानाने धोकादायक पातळी गाठली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहराचा पारा ४० अंशांच्या आसपास रेंगाळत असून उपनगरांमध्ये तो ४१ अंशांच्या पुढे गेला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील दोन दिवस उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याचा इशारा दिला असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या चार दिवसांपासून वातावरणातील प्रतिकूल बदलांमुळे तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सकाळी नऊ-दहानंतरच सूर्याची प्रखरता जाणवू लागते, तर दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही कठीण होत आहे. रस्त्यांवरून फिरताना उन्हाचे तीव्र चटके बसत असून उष्माघाताचा धोका वाढला आहे.

मध्यवर्ती पुण्याच्या तुलनेत उपनगरांमध्ये तापमान अधिक असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही भागांमध्ये कमाल तापमानात दोन ते तीन अंशांचा फरक नोंदवला गेला आहे. बुधवारी ( दि. १५) शहरात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८.९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. आकाश निरभ्र राहून दिवसभर हवामान कोरडे होते.

छत्रपती संभाजीनगरचा पारा ४१ पार! यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद; ‘या’ तारखेला हीट वेव्हचा इशारा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुरुवारी (दि. १६) कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून किमान तापमान १९ अंशांच्या आसपास राहील. पुढील दोन दिवस कमाल तापमान ४० अंशांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीचा उकाडाही वाढण्याची चिन्हे आहेत.

सरकारने जारी केली ‘एसओपी’ 
उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने मानक कार्यपद्धती (एसओपी) जारी केली आहे. विशेषतः बांधकाम, शेती व इतर मैदानी काम करणाऱ्या कामगारांसाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. यामध्ये कामाच्या वेळांमध्ये बदल, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, सावलीची व्यवस्था आणि ओआरएस वितरण यांचा समावेश आहे. उष्माघाताचा त्रास झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत.

Nashik News : पारा ४१.४ अंशावर…! हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद, नाशिक @ ३९.५; सतर्कतेच्या सूचना

राज्यात उष्णतेची लाट येणार?

महाराष्ट्राच्या मराठवाडा, विदर्भ आणि अन्य भागात पुढील काही दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Imd alert to maharashtra pune net two days for heat wave latest weather updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 08:28 PM

Topics:  

  • Heat Wave in Maharashtra
  • Heat Waves
  • IMD alert of maharashtra

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: राज्यावर मोठं संकट; घराबाहेर जाणं टाळा, काही तासांमध्ये मुंबईसह कोकणात…
1

Maharashtra Rain Alert: राज्यावर मोठं संकट; घराबाहेर जाणं टाळा, काही तासांमध्ये मुंबईसह कोकणात…

Pune Rain News: दुपारपासूनच अंधारून आलं अन् पुण्यात कोसळधार; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2

Pune Rain News: दुपारपासूनच अंधारून आलं अन् पुण्यात कोसळधार; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rain Alert: पुणेकरांनो जरा जपूनच! दोन ते दिवसांत असा कोसळणार की…
3

Maharashtra Rain Alert: पुणेकरांनो जरा जपूनच! दोन ते दिवसांत असा कोसळणार की…

Maharashtra Rain Alert: ‘आला गं बाई आला’! पुण्यासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार, २४ तासांत…
4

Maharashtra Rain Alert: ‘आला गं बाई आला’! पुण्यासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार, २४ तासांत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.