
Maharashtra Rain Alert: ऐन थंडीत येणार भीषण संकट; IMD च्या इशाऱ्याने चिंता वाढली, राज्यात काय स्थिती?
हवामान विभागाचा राज्यात पावसाचा इशारा
पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
Maharashtra Weather News: राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. पुणे, नाशिक आणि अन्य जिल्ह्यात तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे. आता कुठे थंडीचा कडाका जाणवायला सुरुवात झाली असली तरी आता पुन्हा एकदा राज्यावर पावसाचे संकट येणार आहे. हवामान विभागाने दिलेला इशारा काय आहे ते पाहुयात.
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दक्षिण अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुढील 24 तासांत अनेक राज्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील अनेक राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे उत्तर आणि मध्य भारतात थंडी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ
आग्नेय बंगालचा उपसागर पुन्हा एकदा सक्रिय होत आहे. चक्रीवादळाचा इशारा देण्यात येत आहे. बंगालच्या उपसागराला चक्रीवादळ सेन्यारचा इशारा देण्यात आला आहे. हवामानशास्त्रज्ञांचा अंदाज आहे की या हंगामातील दुसरे चक्रीवादळ जवळ येत आहे. तामिळनाडू आणि अंदमान आणि निकोबार बेटांदरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे, जे हळूहळू चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.
Senyar Cyclone: 50-60 तासाने होणार विनाश? बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ, ताजे अपडेट जाणून घ्या
हवामान खात्याच्या मते, या कमी दाबाच्या क्षेत्राचे अद्याप वादळात रूपांतर झालेले नाही. तथापि, सर्व हवामान परिस्थिती त्याला चक्रीवादळ वादळात रूपांतरित होण्यास अनुकूल आहेत. तथापि, हे भाकित करणे खूप लवकर आहे. सोमवार, २४ नोव्हेंबर नंतर ते चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे. संयुक्त अरब अमिराती (यूएई) च्या नावावरून या वादळाला सेन्यार, म्हणजेच सिंह असे नाव देण्यात आले आहे.