'या' राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, शाळाही बंद... चक्रीवादळ मोंथा कधी आणि कुठे धडकणार? (फोटो सौजन्य-X)
Cyclone Montha News in Marathi: भारतीय हवामान विभागाच्या (IMD)माहितीनुसार, २८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी किंवा रात्री दरम्यान 110 किमी प्रती तास वेगाच्या वाऱ्यासह तीव्र चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला, विशेषतः काकीनाडा परिसरातून मच्छलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम यांच्या मधून जाण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच पूर्व मध्य अरबी समुद्र आणि दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे भारतीय लष्कराला हाय अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) आणि संबंधित राज्य सरकारांशी समन्वय साधून परिस्थिती कमी करणे हे उद्दिष्ट आहे.
चक्रीवादळ मोंथा २८ ऑक्टोबरपर्यंत तीव्र वादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आंध्र प्रदेशातील मछलीपट्टनम आणि कलिंगपट्टनम दरम्यानच्या किनाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, ज्याचा परिणाम १५ जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळ मोंथा २८ ऑक्टोबरच्या संध्याकाळ किंवा रात्री तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे आणि मछलीपट्टनम आणि कलिंगपट्टनम दरम्यान आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला ओलांडेल, अशी अपेक्षा भारतीय हवामान खात्याने (IMD) सोमवारी जाहीर केली.
हवामान खात्याने सांगितले की, आग्नेय बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या खोल कमी दाबाच्या पट्ट्याचे २६ ऑक्टोबर रोजी चक्रीवादळात रूपांतर झाले. त्यानंतर ते २८ ऑक्टोबर रोजी तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होईल. तर, त्याबद्दल तपशील जाणून घेऊया:
हे चक्रीवादळ ओडिशातील मलकानगिरीपासून अंदाजे २०० किमी अंतरावर असलेल्या आंध्र प्रदेशातील काकीनाडाजवळ धडकण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी १०० किमीपर्यंत पोहोचू शकतो. येणाऱ्या आपत्तीचा परिणाम १५ जिल्ह्यांवर होईल, त्यापैकी आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे येण्याची शक्यता आहे.
याव्यतिरिक्त मोंथा चक्रीवादळामुळे २७ ते ३० ऑक्टोबर दरम्यान आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, खालील भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे:
रायलसीमा, तामिळनाडू, केरळ आणि माहे: २७-२८ ऑक्टोबर
किनारी आंध्र प्रदेश आणि यानम: २६-३० ऑक्टोबर
तेलंगणा आणि ओडिशा: २७-३० ऑक्टोबर
छत्तीसगड: २७-३० ऑक्टोबर
या भागात वादळाचा परिणाम होईल:
आंध्र प्रदेश: काकीनाडा, विशाखापट्टणम, मछलीपट्टणम
ओडिशा: गोपालपूरजवळील परिणाम
तामिळनाडू: चेन्नईपासून दूर, परंतु सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.






