File Photo : aadhar card
अकलूज : राज्य सरकारने खाजगी कंपनीला आधारकार्डचे काम देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो निर्णय तात्काळ रद्द करावा. अन्यथा मंत्रालयातून उड्या मारू, असा इशारा राज्यातील सेतूचालकांनी शिर्डी येथील अधिवेशनातून दिला आहे. शिर्डी येथे राज्यस्तरीय एक दिवसीय राज्यातील सेतूचालकांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनामध्ये आधारच्या खाजगीकरणाविरोधात राज्य सरकारच्या निषेधाचा ठराव मांडण्यात आला. या अधिवेशनासाठी संपूर्ण राज्यातून सेतूचालक उपस्थित होते.
हेदेखील वाचा : EVM Scam: सत्ताधाऱ्यांची दडपशाही सुरू;पृथ्वीराज चव्हाणांचा साताऱ्यातून इव्हीएम विरोधात एल्गार
या अधिवेशनामधून राज्य सरकारकडे काही मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सेतू कार्यालयाला पूर्वीप्रमाणे महा-ई-सेवा केंद्र नाव देण्यात यावे, सेतू कार्यालयातून जे विविध प्रकारचे दाखले दिले जातात, त्या प्रत्येक दाखल्यामागे सेतूचालक यांना शंभर रूपये इतके कमिशन देण्यात यावे, राज्यातील सेतु चालकांचा तसेच सेतु चालक यांच्या कुटुंबाचा राज्य शासनामार्फत विमा उतरवण्यात यावा. नवीन सेतू कार्यालयाचे वाटप करू नये, आधार केंद्रचालक जे ऑपरेटर आहे, त्यांना ब्लॅक लिस्ट करण्यापूर्वी नोटीस देण्यात यावी.
तसेच आधारकार्डचे जे कमिशन बाकी आहे ते कमिशन तत्काल मिळावे, सेतू चालकांना ग्रामपंचायत ऑपरेटर यांच्याप्रमाणे मानधन मिळावे. तसेच आधार किट जमा करण्यासंदर्भात जी शासनाने नोटिस दिली आहे, त्यासाठी सर्वांनी एक होऊन लढावे. यांसारख्या मागण्या राज्य सरकारकडे या अधिवेशनामध्ये करण्यात आल्या आहेत. यावेळी सेतु चालक संघटनेचे राज्य अध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी लावली होती.
आधारकार्डच्या नावाखाली उकळले जाताहेत जास्त पैसे
नव्याने आधारकार्ड काढणे, जुनं आधारकार्ड अपडेट करणे, नावात, जन्मतारखेत असो किंवा इतर गोष्टींमध्ये बदल करण्यासाठी ठराविक रकमेच्या अधिकचे पैसे आकारले जात आहेत. सरकार अर्थात UIDAI कडून अपडेटसाठी 50 रुपये घेण्याचे ठरले आहे. ही रक्कम ठरली असली तरीही हे चालक अपडेटसाठी 200 रुपये इतकेच नाहीतर काही चालक 350 रुपयांपर्यंतही पैसे मागताना दिसत आहेत.
आधारकार्ड सर्व शासकीय कार्यालयात गरजेचे
आधार अर्थात UIDAI द्वारे दिल्या जाणाऱ्या विशेष ओळख क्रमांकाला या नावाने ओळखले जाते. आधारकार्ड सध्या सर्वच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी गरजेचा आहे. आधारच्या माध्यमातून कामे केली जात आहेत.
हेदेखील वाचा : 2025 मध्ये शनिदेवाची कृपा होईल, या राशीच्या लोकांवर राहणार नाही दंडाधिकाऱ्याची नजर