Yashasvi Jaiswal’s commentary on Rohit Sharma : दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात सध्या पाच टी २० मालिका खेळली जात आहे. याधी या दोन संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. ही मालिका भारताने २-१ अशी जिंकली. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने त्याचे पहिले एकदिवसीय शतक झळकावले तर रोहित शर्माने ७५ धावा केल्या आणि शतक गाठण्यापूर्वी मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद होऊन मंगहरी गेला. रोहिला या सामन्यात शतक झळकावण्याची संधी होती, मार त्याला ती गमवावी लागली. त्याठिकाणी जयस्वाल आपले शतक पूर्ण केले, त्याला शतक पूर्ण करण्यास रोहितने मदत केल्याचे यशस्वी जयस्वालने हे उघड केले आहे.
हेही वाचा : कधी काळी बलात्काराचा आरोप! आता ‘त्या’ खेळाडूवरील निलंबन मागे; PCB ने घेतला मोठा निर्णय
त्याकया शतकावर वर बोलताना, जयस्वालने त्याच्या पहिल्या एकदिवसीय शतकाबद्दल भाष्य केले आहे. तो म्हणाला की, “पहिल्या दोन सामन्यांमध्ये कमी धावा झाल्यामुळे मी खूप घाबरलो होतो आणि खूप डॉट बॉल देखील खेळत होतो. पण रोहित शर्माने मला सांगितले, ‘मी जोखीम घेईन, रन रेटची काळजी न करता तु तुझा वेळ घे.” जयस्वालने असे देखील संगितले की, “आणि तुम्ही पाहू शकता की तो किती मोठ्या मनाचा आहे. तो बहुतेक जोखीम घेत होता कारण तो मला स्थिरावत खेळत राहायचे सांगत होता.”
जयस्वालने कार्यक्रमात विराट कोहलीबद्दल देखील चर्चा केली. विशेषतः विराट कोहलीसोबतच्या त्याच्या शतकाच्या सेलिब्रेशनबद्दल, तो म्हणाला की, “‘लगन लगन करके’ नावाचे एक गाणे आहे… तो म्हणाला, ‘तूही ते करायला हवे,’ म्हणून मी म्हणालो, ‘हो, मी करतो.’ तो एक उत्तम क्षण होता. विराट कोहलीमध्ये विनोदाची एक अद्भुतअ शी भावना आहे. तो जेव्हाही आजूबाजूला असतो तेव्हा खूप मजा येते.”असे देखील जयस्वालने सांगितले.
यादरम्यान, जयस्वालने त्याच्या खास शतकाबद्दल देखील गप्पा मारल्या, “मी काढलेली सर्व शतके माझ्यासाठी खूप खास आहे, पण विशेषतः जेव्हा मी ओव्हलमध्ये कसोटी सामन्यात १०० धावा फटकावल्या होत्या, तेव्हा माझे संपूर्ण कुटुंब आले होते आणि ते मला पहिल्यांदाच कसोटी सामना खेळताना पाहत बसले होते, ते माझ्यासाठी खूप विशेष होते.”
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात जयस्वालने शानदार फलंदाजी केली आणि त्याचे पहिले शतक ठोकले. जयस्वालने ११६ धावांची नाबाद खेळी साकारली होती.






