अण्णा हजारे आमरण उपोषण करणार (फोटो- ani)
अण्णा हजारे पुन्हा उपसणार उपोषणाचे हत्यार
लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी करणार उपोषण
मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिले पत्र
मुंबई: सध्या नागपूरमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे राज्याचे मंत्रिमंडळ नागपूरमध्ये आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण ज्येष्ठ समाजसेवाक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. लोकायुक्त कायद्याच्या (Law) अंमलबजावणीसाठी अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
ज्येष्ठ समाजसेवाक अण्णा हजारे सरकारविरुद्ध पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहेत. लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अण्णा हजारे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. अण्णा हजारे यांनी उपोषणाची तारीख जाहीर केली आहे.
अण्णा हजारे 30 जानेवारी 2026 पासून राळेगणसिद्धी येथील मंदिरात उपोषणाला बसणार आहेत. महाराष्ट्र सरकारने 28 डिसेंबर 2022 मध्ये विधानसभेत आणि 15 डिसेंबरला विधानपरिषदेत मंजूर दिले केले आहे. तरी अजूनही या कायद्याची अंमलबजावणी न झाल्याने अण्णा हजारे आक्रमक झाले आहेत.
उपमुख्यमंत्री शिंदेंनी अण्णा हजारेंच्या थेट गावी जाऊन घेतली भेट
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची त्यांच्या राळेगणसिद्धी या गावी जाऊन सदिच्छा भेट घेतली. अण्णांनी राळेगणसिद्धी येथे केलेले जलसंधारणाचे उत्कृष्ट काम संपूर्ण देशवासियांसाठी दिशादर्शक आहे. याच ठिकाणी आता बांबू लागवड अभियान हाती घेण्यात येणार असून, या कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री शिंदेंनी अण्णा हजारेंच्या थेट गावी जाऊन घेतली भेट; ‘हे’ कारण ठरतंय चर्चेचं
अण्णा हजारे यांच्या भेटीबाबत सांगताना एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर म्हटले की, येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्ण झाले असून, इतर अनुषंगिक कामे पूर्ण करण्यासंदर्भात मागणी करणारे निवेदन दिले. यासंदर्भात आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना फोन करून सदर काम स्वतः लक्ष घालून पूर्ण करण्याचे निर्देश दिले. राळेगणसिद्धी गावातील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या शंभूराज मापारी याला डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने 25 हजारांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. दरम्यान, राळेगणसिद्धी येथे येणाऱ्या पर्यटकांना पद्मभूषण अण्णा हजारे यांचा जीवनपट ‘किसन हजारे ते अण्णा हजारे’ दाखवण्यासाठी केंद्र उभारण्याची मागणी केली. ही मागणीही तात्काळ पूर्ण करण्यासाठी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांना सांगितले.






