फोटो सौजन्य - Social Media
रहमान डकैतचे पूर्ण नाव ‘सरदार अब्दुल रहमान बलोच’ असे होते. त्याचा जन्म पाकिस्तानच्या कराची येथे असणाऱ्या ल्यारीमध्ये झाला. सिनेमात त्याला अतिशय क्रूर दाखवण्यात आले आहे आणि तोही खऱ्या आयुष्यातही तसाच होता. त्यामुळे त्याचा व्यवसाय नक्की होता तरी काय? गँगस्टर की राजकीय नेता? असा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे. मुळात, तो दोन्ही होता. त्याची सुरुवात एक गँगस्टर म्हणूनच झाली. अवघ्या वयाच्या १३ व्या वर्षात त्याने पहिला खून केला. तो खून त्याच्या आईचा होता. आपल्या धंद्यात कुणी दखलबाजी केलेलं त्याला आवडत नव्हतं. आईने केलं आणि त्याने त्याच्या आईला कायमचं संपवलं.
मुळात, त्याचे संपूर्ण कुटुंब गुन्हेगारी क्षेत्रातले होते, त्यामुळे अगदी जन्मापासून तो याच वातावरणात वाढत होता. हिंसक वृत्ती त्याच्या डोक्यात भिनलेली होती. पुढे जाऊन त्याने ड्रग्ज, हत्यांकडे उभारले आणि कराचीच्या ल्यारी क्षेत्रात स्वतःचे एक साम्राज्य उभे केले. अनेक गंभीर गुन्हे आणि हिंसाचाराचे आरोप आहेत. शेवटी २००६ मध्ये पाकिस्तानच्या पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला, त्यामध्ये तो ठार मारला गेला. रहमान डकैत पाकिस्तानची प्रसिद्ध राजकीय पार्टी पाकिस्तान पीपल्स पार्टीसह जोडलेला होता. चित्रपटातही या गोष्टींचे वर्णन करण्यात आले आहे.






