Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सरकारी जागेतील धार्मिक स्थळे तातडीने हटवा’; भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची मोठी मागणी

पुरंदर तालुक्यातील भिवरी जवळील धरणाच्या परिसरात कोंढवा भागातील काही जण आपला धार्मिक विधी करताना आढळून आले होते. त्यावेळी स्थानिक लोकांनी त्यांना हुसकावून लावताना अरेरावीची भाषा करून वाद घातला होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 09, 2026 | 01:06 PM
रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन म्हणजे 'नटरंग चित्रपटाच्या शूटिंगची एक्टिंग' -आ.गोपिचंद पडळकर

रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन म्हणजे 'नटरंग चित्रपटाच्या शूटिंगची एक्टिंग' -आ.गोपिचंद पडळकर

Follow Us
Follow Us:

सासवड : सरकारी जागेतील बेकायदेशीर धार्मिक स्थळे तातडीने हटवावी, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. सरकारी जागेत जिथे-जिथे बेकायदेशीर धार्मिक स्थळे निर्माण केली आहेत, ती सर्व स्थळे कोणत्याही परिस्थितीत हटली पाहिजेत यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांना निवेदन देणार आहे. हिंदू समाजाने आता जागृत होण्याची आवश्यकता आहे, असे आवाहनही आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

पुरंदर तालुक्यातील भिवरी जवळील धरणाच्या परिसरात कोंढवा भागातील काही जण आपला धार्मिक विधी करताना आढळून आले होते. त्यावेळी स्थानिक लोकांनी त्यांना हुसकावून लावताना अरेरावीची भाषा करून वाद घातला होता. एवढ्यावर न थांबता जवळपास १५० ते २०० हिंदू तरुणांच्या विरोधात सासवड पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज्यातील काही आमदारांनी यामध्ये उडी घेत थेट विधानसभेत प्रश्न उपस्थित करून कारवाईची मागणी केली होती.

सासवड पोलिसांनीही स्थानिक लोकांची धरपकड करत अनेक जणांना अटक केली. त्यामुळे काहीच्या विरोधात पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता. पुरंदरमध्ये येवून नमाज पठण आणि रोजाच्या नावाखाली एकत्रित जमून मटणाच्या पार्ट्या करायच्या आणि आमच्याच विरोधात रील्स तयार करून गरळ ओकायची, त्यातून महिला, मुलींच्या बाबतीत एखादी घटना घडल्यास जबाबदार कोण? असे प्रश्न तालुक्यातील विविध हिंदू संघटनांकडून पोलिसांना उपस्थित करण्यात आले होते. पोलिसांनी त्यांच्यावर करवाई करून पुरंदरमध्ये येण्यापासून रोखावे, अशी मागणीही केली होती.

दरम्यान, पोलिसांनी हिंदू तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करून अटक केल्याच्या निषेधार्थ तसेच भिवरी गावात येवून दहशत माजविणाऱ्या कोंढव्यातील टोळक्यावर गुन्हे दाखल करून कारवाईची मागणी करत तसेच तालुक्यात जमीन खरेदीच्या नावाखाली शासकीय जागेत अतिक्रमण करून नमाज पठण करणे, हिंदूंच्या भावना भडकविणे याविरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला.

Sangli News: “विजेता कोण हे घोषणा नाही, जनता ठरवते!” गोपीचंद पडळकरांच्या इशाऱ्याला खासदार विशाल पाटील यांनी सुनावले

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सासवड येथील शिवतीर्थवरून या मोर्चास प्रारंभ करण्यात आला. पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांच्यासह आमदार संग्राम जगताप, सोलापूर जिल्ह्याचे हिंदू धर्मरक्षक डॉ. धवलसिंह मोहिते पाटील त्याचबरोबर पुरंदर तालुक्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी आणि हजारो युवक सहभागी झाले होते. मोर्चा सुरु होण्यापूर्वी पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांना आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार संजय जगताप यांनी निवेदनही दिले.

बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार

बारामतीच्या राजकीय वर्तुळातून मोठी अपडेट समोर आली आहे. काँग्रेसने  बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारपर्यंत वरिष्ठांशी चर्चा करून अधिकृतरित्या अर्ज मागे घेतला जाईल, असे सांगितले जात आहे.   उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह आमदार रोहित पवार  यांनी काँग्रेसशी केलेल्या चर्चेनंतर अखेर काँग्रेसने आकाश मोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.  दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी  थेट काँग्रेस राष्ट्राध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याशीही चर्चा केली.  त्यापूर्वी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशीही फोनद्वारे बातचीत केली होती.

Web Title: Immediately remove religious structures situated on government land bjp mla gopichand padalkar makes demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
1

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
2

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Maharashtra Breaking News Today 2026:  राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह
3

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह

Maharashtra Breaking News Today 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग
4

Maharashtra Breaking News Today 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.