सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक उपक्रम
गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांसाठी विशेष सुविधा, मोफत पाणी, आरोग्य सेवा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सर्व उपक्रमांमुळे कोकण रेल्वेने प्रवासी-केंद्रित सेवा, सुरक्षितता आणि विकास यामध्ये महत्वपूर्ण पाऊल टाकले असून, भविष्यातही अशाच प्रकारे प्रगती सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ड्रोनच्या मदतीने ट्रॅक मॉनिटरिंगसारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले, प्रवाशांच्या सोयीसाठी विविध सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या असून, दिव्यांगांसाठी रॅम्प, ब्रेल साइनज, सुधारित सूचना फलक लावण्यात आले आहेत.
या कालावधीत कोकण रेल्वेने ‘देव दर्शन स्पेशल 66 ट्रेन ‘सह अनेक नवीन सेवा सुरू केल्या, राजणगाव अयोध्या आणि रामेश्वरम यांना जोडणाऱ्या सहा विशेष गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय गणपती, उन्हाळा आणि हिवाळा हंगामात 1400 हून अधिक विशेष गाड्या चालवण्यात आल्या. याचा लाखो भाविकांना लाभ झाला आहे.
– सुनील नारकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी






