
Abhijeet Deepke on imran khan
बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर इम्रानला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे. या कारवाईनंतर आता हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, CJP संस्थापक अभिजित दिपके यांनी या मुद्द्यावरून अमेरिकन गायिका मेरी मिल्बेन यांच्यावर निशाणा साधला आहे. (Abhijeet Deepke)
10 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन झालं होतं. या आंदोलनात इम्रान खान सहभागी झाला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर परदेशी नागरिक असूनही आंदोलनात सहभागी झाल्याचा मुद्दा उपस्थित झाला.
इम्रान खान अमेरिकेचा नागरिक असून त्याच्याकडे OCI कार्ड आहे. या पार्श्वभूमीवर त्याला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे. नोटीसला आव्हान देण्यासाठी इम्रान खानच्या वकिलांकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे आता या प्रकरणात न्यायालय काय भूमिका घेतं, याकडे लक्ष लागलं आहे.
Neha Bora PC Conference: तुम्ही आमची चळवळ बंद पाडू शकणार नाही…; नेहा बोराने ठणकावून सांगितलं
दरम्यान, अमेरिकन गायिका मेरी मिल्बेन यांनी CJP ला अमेरिकेतून निधी मिळत असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांवर अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. मेरी मिल्बेन अमेरिकन नागरिक असूनही भाजपच्या बाजूने बोलू शकतात; मात्र OCI कार्डधारक इम्रान खान भाजपविरोधात बोलू शकत नाहीत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दिपके यांनी परदेशी व्यक्तींनी भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, अशी भूमिकाही मांडली होती.
Mary Millben, an American, can speak in favour of the BJP. But Imran, an OCI cardholder, can’t say anything against the BJP. 🫡🫡🫡 — Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) October 15, 2026
एकीकडे इम्रान खानला मिळालेली नोटीस आणि दुसरीकडे त्यावरून सुरू झालेला राजकीय वाद, यामुळे हे प्रकरण चर्चेत आलं आहे. आता इम्रानच्या याचिकेवर न्यायालयात काय घडतं आणि नोटीसबाबत पुढे काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.