Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhosari Election News: भोसरीत निवडणुकीच्या आखाड्यात लांडगे विरुद्ध लांडगे! जाळ अन् धूर संगटच निघणार

भारतीय जनता पार्टीचे नेते दिवंगत अंकुश लांडगे यांचे पुतणे रवी लांडगे आणि विद्यमान आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक राजेंद्र लांडगे यांच्या पॅनल असणार आहे. या प्रभागात राष्ट्रवादी, शिवसेना नेते एकत्र लढू शकतात.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 17, 2025 | 12:34 PM
PCMC Municipal Election 2025, BJP-Shivsena Politics,

PCMC Municipal Election 2025, BJP-Shivsena Politics,

Follow Us
Close
Follow Us:
  • भोसरी प्रभाग क्रमांक सहा’मध्ये रवी लांडगे आणि राजेंद्र लांडगे यांच्या पॅनलमध्ये जोरदार फाईट
  • 2017 च्या निवडणुकीप्रमाणे प्रभाग “रचना जैसे थे”
  • भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण आम्ही थांबवले- रवी लांडगे
Pimpri-Chinchwad News: भोसरी प्रभाग क्रमांक सहा मध्ये पूर्वी एकत्र असणारे मात्र सध्या वेगवेगळ्या पक्षात प्रवेश केलेले रवी लांडगे आणि राजेंद्र लांडगे यांच्या पॅनल मध्ये जोरदार फाईट होणार आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते दिवंगत अंकुश लांडगे यांचे पुतणे रवी लांडगे आणि विद्यमान आमदार महेश लांडगे (Mahesh Landge)  यांचे कट्टर समर्थक राजेंद्र लांडगे यांच्या पॅनल असणार आहे. या प्रभागात राष्ट्रवादी, शिवसेना नेते एकत्र लढतील असे चित्र दिसत आहे. 2017 च्या निवडणुकीप्रमाणे प्रभाग “रचना जैसे थे” आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये कोणताही बदल नाही. ज्याअर्थी 2017 प्रमाणे प्रभाग निश्चित झाले आहेत. त्यासाठी 2011 ची जनगणना गृहीत धरण्यात आली आहे. तत्कालीन जनगणनेनुसार, प्रभागाची लोकसंख्या 53 हजार 120 इतकी दर्शवण्यात आली आहे. त्यापैकी 4 हजार 700 इतकी अनुसूचित जाती आणि 1 हजार 800 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.

प्रभागातील मागील राजकीय स्थिती; रवि लांडगे यांची निर्णायक भूमिका

लोकसंख्येच्या प्रमाणानुसार, 2017 प्रभाग मध्ये शहरात भाजपाची मोठी लाट होती. नगरसेवक निवडून आले होते. या प्रभागातून भाजपाचे चारही प्रभागातील अ गटातून भाजपाच्या यशोदा बोईनवाड यांनी 12 हजार 628 मते मिळवत, राष्ट्रवादीच्या आशा सुपे यांचा पराभव केला होता.

Nanded Municipal Election: काँग्रेसची यंत्रणा निद्रावस्थेत; प्रभाग एक मधून इच्छुकांची भाजपाकडे मांदियाळी

ब- गटातून भाजपच्या तिकीटावर लढलेल्या सारिका लांडगे यांनी 9 हजार 240 मते मिळवली होती. त्यांनी राष्ट्रवादीच्या सुनिता गवळी आणि शिवसेनेच्या करिष्मा बढे यांचा पराभव केला होता. विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या त्यावेळी समर्थक असलेल्या सारिका लांडगे यांनी विधानसभा निवडणूक 2024 पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar)  गटात  आणि त्यानंतर आता त्या राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत.

क गटातून तत्कालीन भाजपाचे रवि लांडगे या प्रभागातून बिनविरोध निवडून आले होते. त्यावेळी राष्ट्रीय खेळाडू योगेश लांडगे यांनी माघार घेतली आणि रवि यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला. मात्र, आमदार महेश लांडगे यांचे समर्थक असलेले रवि लांडगे यांनी स्थायी समिती सभापती संधी न दिल्यामुळे नंतरच्या काळात महेश लांडगेंच्या विरोधात भूमिका घेतली. भाजपा सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला.

भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण आम्ही थांबवले. कोविड काळात हजारो नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे. बहुउद्देशीय सभागृह आणि रुग्णालयाचे आरक्षण विकसित झाले, प्रभागातील नागरिकांच्या संपर्कात आहोत, सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. त्यामुळे विकासकामांच्या जोरावर आम्ही निवडणूक निश्चितपणे जिकणार आहोत.
– रवि लांडगे, माजी नगरसेवक,

गेल्या 8 वर्षांमध्ये आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. लोकांसोबत आमचे एक विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. रेड झोन आणि प्राधिकरण हद्दीत विखुरलेल्या प्रभागात आम्ही पायाभूत सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला लोकांची साथ मिळेल आणि आमचे चारही नगरसेवक निवडून येतील.
राजेंद्र लांडगे, भाजपा

Latur Crime: पतीचं दुसऱ्या महिलेसोबत लफडं, सततच्या छळाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

 

प्रभागातील आरक्षण व मतदारांची माहिती

प्रभागातील आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे :

प्रभाग अ : ओबीसी महिला

प्रभाग क : महिला

प्रभाग य : ओबीसी

प्रभाग उ : खुला (ओपन)

या प्रभागात एकूण ४१,२४८ मतदार आहेत. यामध्ये २३,५७५ महिला तर १७,६७१ पुरुष मतदारांचा समावेश आहे.

२०२४मधील स्थिती

महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक 2024 मध्ये जोरदार तयारी केली. निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. मात्र, महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये त्यांना सधी मिळाली नाही. विधानसभा निवडणुकीत त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटातून निवडणूक लढवलेले अजित गव्हाणे यांच्यासाठी रवि लांडगे यांनी प्रचार केला. मात्र, या निवडणुकीत महेश लांडगे यांनी बाजी मारली. महेश लांडगे यांना मताधिक्य मिळाले.

 

 

Web Title: In bhosari ward number six there is a tough fight between the panels of ravi landge and rajendra landge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 12:34 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • mahesh landage
  • Municipal Elections News

संबंधित बातम्या

Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळातून डच्चू..? आमदारकी रद्द
1

Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळातून डच्चू..? आमदारकी रद्द

Manikrao Kokate News:  माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल?
2

Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल?

आचारसंहिता लागताच पिंपरी-चिंचवडमध्ये प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर; एकाच दिवसात 4819 अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई
3

आचारसंहिता लागताच पिंपरी-चिंचवडमध्ये प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर; एकाच दिवसात 4819 अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई

Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद धोक्यात; ‘या’ प्रकरणात दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा
4

Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद धोक्यात; ‘या’ प्रकरणात दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.