• लग्नानंतर वर्षभरातच संशय व छळ सुरू
• पतीचे दुसऱ्या महिलेसोबत चॅटिंग उघड
• पत्नीची आत्महत्या; पती-सासऱ्यावर गुन्हा
लातूर: लातूर मधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका नवविवाहितेने पतीच्या संशय आणि सततच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पती सतत पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा छळ करत होता. मात्र त्याचंच दुसऱ्या महिलेसोबत नको ते कारनामे करत होता. हेचा महिलेला सहन झालं नाही. आपली चूक नसतांना आपल्यावर संशय घेतला जात होता. छळ करण्यात येत होते. या सगळ्याला कंटाळून विवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आरती रामेश्वर उरगुंडे असे आहे. ती रायवाडीची मूळ रहिवाशी होती. ती लग्नानंतर लातूरच्या वरवंटी इथे राहत होती. आरती हीच विवाह रामेश्वर उरगुंडे यांच्याशी 7 मे 2023 रोजी झाला होता. लग्नाच्या एक वर्षानंतर रामेश्वर हा आरतीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यातून तिचा मानसिक व शारीरिक छळ करू लागला. आरतीने कोणतीही गोष्ट मागितली तर माहेराहून घेऊन ये असे तो तिला म्हणत होता. एवढेच नाही तर तिला मारहाण करत होता.
शुक्रवारी आरती हिला रामेश्वर याच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या महिलेचे मेसेज सापडले. तिने याचा जाब रामेश्वरला विचारला तेव्हा रामेश्वरने तिला ‘तुला काय करायचे ते करून घे’ असे म्हंटले आणि मारहाण केली. याघटनेची माहिती तिले आपल्या वडिलांना सांगितले. वडील तिच्या घरी आले आणि दोघांचीही समजूत काढली. आरतीचे वडील तिथून काही अंतरावरच गेले होते. तर पुन्हा तिच्या पतीने मारहाण केली.
आरतीने पुन्हा वडीलांना फोन केला. तिने पुन्हा मारहाण केल्याचे सांगितले. त्याचवेळी आरतीने स्वतःला एका रूममध्ये कोंडून घेतले होते. तर बाहेरून तिचा पती रामेश्वर कुऱ्हाडीने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी छोट्या फटीतून राजेंद्र दरेकर यांनी घरात पाहिले तेव्हा आरतीचे पाय लाटकत असल्याचे त्यांना दिसले. तेव्हा दरवाजा तोडून घरात प्रवेश करून पहिले तर आरतीने पंख्याला लटकून गळफास घेतला होता. त्यानंतर आरतीच्या वडिलांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. त्यांनी जावई रामेश्वर उरगुंडे आणि आरतीचा सासरा सिद्धेश्वर उरगुंडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
Ans: लातूरजवळील वरवंटी शिवारात.
Ans: पतीकडून सतत संशय, मारहाण व मानसिक छळ.
Ans: पती आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.






