Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंदापुरात शरद पवार गट आक्रमक; ईव्हीएम हटाओ देश बचाओच्या जोरदार घोषणा

ईव्हीएम हटाओ देश बचाओ अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गुरुवारी इंदापूर प्रशासकीय भवन या ठिकाणी ईव्हीएम विरोधी आंदोलन करण्यात आले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 13, 2024 | 03:07 PM
इंदापुरात शरद पवार गट आक्रमक; ईव्हीएम हटाओ देश बचाओच्या जोरदार घोषणा

इंदापुरात शरद पवार गट आक्रमक; ईव्हीएम हटाओ देश बचाओच्या जोरदार घोषणा

Follow Us
Follow Us:

इंदापूर : ईव्हीएम हटाओ देश बचाओ अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि.१२) इंदापूर प्रशासकीय भवन या ठिकाणी ईव्हीएम विरोधी आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी अनेकांनी ईव्हीएम विरोधात रोष व्यक्त करीत इथून पुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी केली. प्रसंगी नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड. राहुल मखरे, राज्य कार्यकारिणी सदस्य अमोल भिसे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, तालुकाध्यक्ष ॲड. तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, प्रा. कृष्णा ताटे आदींनी आपल्या भाषणातून ईव्हीएम संदर्भात रोष व्यक्त केला.प्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे राज्य सरचिटणीस संदिपान कडवळे, शहराध्यक्ष ॲड. ईनायतअली काझी, हनुमंत कांबळे, ॲड. आशुतोष भोसले, सुरज धाईंजे, मयूर शिंदे, समद सय्यद, हमीद आतार, विकास खिल्लारे, श्रीकांत मखरे, अक्षय कोकाटे, बाबासाहेब भोंग, गौस सय्यद, सचिन बेसरे, नितीन देशमाने, स्वप्निल देशमाने, सतीश आढाव, गणेश चंदनशिवे, भारत चंदनशिवे,नागेश भोसले, संजय शिंदे, अनिकेत निंबाळकर, स्वप्निल सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, उपस्थित कार्यकर्त्यांनी ईव्हीएम हटाव देश बचाव. भारतीय संविधानाचा विजय असो. मत देणे आमचा अधिकार असेल तर त्याचा हिशोब मागणे हा सुद्धा आमचा अधिकार आहे, अशा आशयाचे बॅनर झळकवीत ईव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचे दहन केले.

ईव्हीएमच्या माध्यमातून मुक्त वातावरणामध्ये नि:पक्ष आणि पारदर्शक निवडणुका होत नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रासह देशात ईव्हीएम विरोधी उठाव होत असताना निवडणूक आयोगाने उत्तर देणे आणि शंकेचे निरसन करणे गरजेचे आहे. परंतू ईव्हीएम ला भाजप आणि आरएसएसचे लोक समर्थन देत आहेत, याचा अर्थ ईव्हीएम चा थेट फायदा भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना होत असल्याचे स्पष्ट होत आहे. – ॲड. राहुल मखरे (प्रदेश प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)

राज्यात महायुतीला यश

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा पूर्ण निकाल पाहिले तर महायुतीला मोठं यश मिळाले आहे. महाराष्ट्र निकालाचा अंतिम आकडा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. महाराष्ट्रात 288 पैकी 132 जागांवर भाजपला यश आलं आहे. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला यश मिळालं आहे. शिंदे गटाला 57 जागांवर यश मिळालं आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 41 जागांवर यश मिळालं आहे.

Web Title: In indapur sharad pawar group protested against evms nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 03:04 PM

Topics:  

  • BJP
  • maharashtra
  • narendra modi

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.