Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्लामपुरात मोठा थरार; ट्रकमधील सीएनजी सिलिंडरला गळती अन्…

इस्लामपूर बस स्थानकासमोरील रस्त्यावर सीएनजी वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील सिलिंडर पाईपला अचानक गळती लागल्याने प्रचंड घबराट निर्माण झाली. मंगळवारी दुपारी पावणेतीनच्या दरम्यान हा प्रकार घडला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 26, 2024 | 12:55 PM
इस्लामपुरात मोठा थरार; ट्रकमधील सीएनजी सिलिंडरला गळती अन्..

इस्लामपुरात मोठा थरार; ट्रकमधील सीएनजी सिलिंडरला गळती अन्..

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामपूर : इस्लामपूर बस स्थानकासमोरील रस्त्यावर सीएनजी वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील सिलिंडर पाईपला अचानक गळती लागल्याने प्रचंड घबराट निर्माण झाली. मंगळवारी दुपारी पावणेतीनच्या दरम्यान हा प्रकार घडला. तब्बल अर्धातास गळती सुरू राहिल्याने मोठ्या प्रमाणावर सीएनजी हवेत मिसळला. संपूर्ण सिलिंडर रिकामी झाल्याने परिसरातील वातावरण प्रदूषित झाले. गळती झालेल्या सीएनजीने पेट घेतला असता तर मोठी हानी झाली असती. सीनजी पेटला नसल्याने अनेकांनी सुटेकचा निःश्वास टाकला.

वाघवाडी फाटा येथून सीएनजी रिफिलींग करून ट्रक (एचआर ५५ पी ६१९१) कलेढोणला (कवठेमहांकाळ) निघाला होता. इस्लामपूर बसस्थानकासमोर आल्यावर ट्रकवरील रॅकवर फिट केलेल्या सीनजी सिलिंडरच्या पाईपला अचानक गळती सुरू झाली. जोरदार प्रेशरने सीएनजीचे हवेत फवारे उडत होते. मोठा आवाज करत सीनजी मिसळला जात होता. हे पाहून नागरिकांनी आरडाओरडा केली. या आवाजाने चालक आणि सहाय्यक चालकांने गाडी थांबवली. प्रचंड प्रमाणात गॅस गळतीचा आवाज येत असल्याने लीक होणाऱ्या सीएनजी सिलिंडरचे स्विच बंद करण्याचे प्रयत्न केले. परंतु संपूर्ण सीएनजी हवेमध्ये मिसळला गेल्याने प्रेशर हळू हळू कमी होत गेले. सतर्क नागरिकांनी पोलीस व अग्निशमन दलाला कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

अचानकपणे सुरू झालेल्या सीनजी गळतीच्या भीतीने इस्लामपूर बस स्थानक परिसरातील नागरिकांची धावाधाव झाली. चालकाने वाघवाडी फाटा येथील रिफिलिंग करणाऱ्या युनिटमध्ये तातडीने फोन करून टेक्निशियनला बोलावून घेतले. तोपर्यंत रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत संबंधित सीनजी गळती लागलेला ट्रक तातडीने शहराच्या बाहेर वाघवाडी रस्त्याला नेण्यास चालकाला भाग पाडले.

इस्लामपूर नगरपालिकेच्या अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या होत्या. सीएनजीने पेट घेतला तर मोठा अनर्थ घडेल, या भीतीपोटी परिसरातील नागरिकांनी रस्त्यावरून व घटनास्थळापासून दूर जाणे पसंत केले. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वरुटे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप यादव, पोलीस नाईक शरद बावडेकर, पोलीस कॉन्स्टेबल सचिन मोरे, पंकज कांबळे यांनी धाव घेत वाहतुकीचे नियोजन केले. व गळती लागलेला ट्रक तातडीने शहराच्या बाहेर काढला.

वीजपुरवठा खंडीत झाल्याने टळली आग

बस स्थानकाच्या समोर पेठ सांगली रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या गटारींची कामे सुरू आहेत. बस स्थानकाच्या आवारात काँक्रिटीकरण सुरू असल्याने एकाच प्रवेशद्वारातून एसटीची ये-जा सुरू असते. याच प्रवेशद्वासमोर नेहमीच वाहतुकीची कोंडी असते. तिथेच ट्रक दुर्घटनाग्रस्त होवून सीएनजी मोठ्या प्रमाणात गळती होत होता. वाहतूक कोंडी नसल्याने काही क्षणात रस्ता व बस स्थानकाचा परिसर निर्मनुष्य झाला. मंगळवार असल्याने लोडशेडिंग होते. सर्वत्र विद्युत पुरवठा खंडित होता. नाहीतर सीएनजीचे फवारे विद्युत तारेवर जात होते. तिथे प्रवाह सुरु असता तर आग लागली असती तर काय झाले असते याची घटनास्थळी चर्चा होती.

परिसरातील व्यवसायिकांचे धाबे दणाणले

गॅस गळती सुरू असतांना हाकेच्या अंतरावर असणाऱ्या खाद्य पदार्थ बनवणाऱ्या हातगाड्या चालकांची धांदल उडाली. इथे हातगाड्यांची ही संख्या अधिक आहे. ही घटना घडली तेव्हा अनेकांच्या गॅस शेगड्या सुरू होत्या. गोंधळ उडाल्यानंतर सर्वच हातगाडी चालकांनी शेगड्या बंद करून सिलिंडर सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी धावाधाव केली. मोठी आग लागू शकते. मोठा धोका होऊ शकते, याची जाणीव झाल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी होत्या. दुर्घटनागस्त ट्रक शेजारी रिक्षा थांबा असल्याने तिथे दहा ते बारा रिक्षा थांबून होत्या. रिक्षात बसलेल्या चालकांनी गॅस गळती सुरू होताच गाड्या सोडून सुरक्षित जाणे पसंत केले. सर्वच रिक्षा सीएनजीवर असल्याने आग लागून मोठा धोका निर्माण होईल, या भीतीने रिक्षाचालक भीतीने गांगरून गेले होते.

गॅस गळतीचा पक्षी व मुक्या प्राण्यांना त्रास

इस्लामपुरात झालेल्या गॅस गळतीचा परिणाम एक किलोमीटर अंतरावर दिसून आला. वाऱ्याच्या झोताने बसस्थानकाच्या पूर्वेकडील बाजूला सीएनजी संपूर्ण गॅसचा वास पसरला होता. बसस्थानक परिसरामध्ये असणाऱ्या झाडांवर वास्तव्यास असणाऱ्या अनेक पक्षांना याचा प्रचंड त्रास झाला. हे पक्षी आकाशात सैरभैर फिरत होते. रस्त्याने जाणाऱ्या मोकाट कुत्र्यांनाही गॅस गळतीचा फटका बसला. अनेक श्वान मूर्च्छित पडली होती.

Web Title: In islampur an incident has come to light that a cylinder in a truck transporting cng has leaked nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2024 | 12:55 PM

Topics:  

  • maharashtra
  • sangli news
  • sangli police

संबंधित बातम्या

Satara News: वाईत मृत्यूचा सापळा ठरलेला रस्ता; प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांचा संताप उसळला
1

Satara News: वाईत मृत्यूचा सापळा ठरलेला रस्ता; प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांचा संताप उसळला

Satara Politics: काँग्रेसच्या सृजन अभियानाची साताऱ्यातून सुरुवात, हिमाचल प्रदेशचे आमदार मलिंदर राजन यांची प्रमुख उपस्थिती
2

Satara Politics: काँग्रेसच्या सृजन अभियानाची साताऱ्यातून सुरुवात, हिमाचल प्रदेशचे आमदार मलिंदर राजन यांची प्रमुख उपस्थिती

मे महिन्यात Tulja Bhavani Temple विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
3

मे महिन्यात Tulja Bhavani Temple विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

Mhasobachiwadi : ९४ व्या नारळी सप्ताहाचा म्हसोबाची वाडी येथे थाटात समारोप; १ लाख भाविकांसाठी महाप्रसादाचा डोंगर!
4

Mhasobachiwadi : ९४ व्या नारळी सप्ताहाचा म्हसोबाची वाडी येथे थाटात समारोप; १ लाख भाविकांसाठी महाप्रसादाचा डोंगर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.