कवठेमहांकाळ येथील डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरी बनावट आयकर अधिकारी बनून छापा टाकणाऱ्या चोरट्यांच्या टोळीतील तिघांना अवघ्या ६० तासात पोलिसांनी जेरबंद केले आहे.
मिरजेतील शासकीय रुग्णालयातून तीन दिवसांपूर्वी पळवून नेलेले बाळ काल रात्री सापडल्याची माहिती समोर आली आहे. चोरट्या महिलेला पोलिसांनी गजाआड करत सावळज येथे कारवाई केली आहे.
मोरबगी (ता. जत) येथे सराफाच्या गाडीवर दरोडा टाकून दहा लाखाच्या मुद्देमाल लंपास करणाऱ्या सात जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले.
बांगलादेशातील राजकीय अस्थिर वातावरणामुळे तेथून घुसखोरी करून कोलकता, पुणेमार्गे थेट सांगलीत येऊन एका लॉजवर राहणाऱ्याला सांगली शहर पोलिसांनी रविवारी सकाळी अटक केली आहे.
सहा पोलिसांची फसवणूक केल्याप्रकरणी संतोष यशवंत खरात (वय २७, रा. सांगलीवाडी, सांगली) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी पहाटे सांगलीवाडीतून अटक केली आहे.
जत पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने २४ तासांत वयोवृद्ध महिलेला लुटणाऱ्या आरोपीस अटक केली आहे. आरोपीने चोरलेला १ लाख ३५ लख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
हॉटेलच्या पार्किंगमधून ट्रक चोरून कर्नाटकात स्क्रॅप करणाऱ्या आंतरराज्य टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारासह दोघांना अटक करण्यात आली असून, एक पसार आहे.
सांगलीत तीन दिवसांपूर्वी सत्यविजय चौकात किरकोळ कारणातून डोक्यात फरशी मारल्याच्या घटनेनंतर दोन्ही गट समोरासमोर आल्यामुळे वाद उफाळून आल्याचा प्रकार घडला आहे.
येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील १८ वर्षीय विद्यार्थ्याचा राजस्थानच्या कोटा शहरात १ जानेवारीला मृत्यू झाला आहे. कुटुंबातील एकुलत्या मुलाच्या मृत्यूने खंडागळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
इस्लामपूर बस स्थानकासमोरील रस्त्यावर सीएनजी वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील सिलिंडर पाईपला अचानक गळती लागल्याने प्रचंड घबराट निर्माण झाली. मंगळवारी दुपारी पावणेतीनच्या दरम्यान हा प्रकार घडला.
कोल्हापूर येथील एका विवाहितेने सांगलीतील तरुणाशी दुसरे लग्न केले. त्यासाठी स्वत:चे नावही बदलले. खोटे लग्न करून पतीला दीड लाखाचा गंडा घातला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांची टोळी जेरबंद केली आहे.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने नऊ वर्षांच्या तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली आहे. संशयित भरत विश्वनाथ कांबळे (वय ४८, रा. सुभाषनगर,…
कृषी क्षेत्रात कार्यरत ऑरबीट क्रॉप मायक्रोनुट्रीयंटस् या कंपनीची २३ लाख २५ हजार २८४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लेखापाल दाम्पत्यासह बँकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
जत पोलिसांनी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाला अवैधरित्या शस्त्रे बाळगणारे लोकांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांना एक इसम पिस्टलसह नागजकडे जाणाऱ्या रोडलगतच्या स्मशानभूमीजवळ,…