Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी चिंचवड शहरात १ हजार १९ जणांचे नळजोड नियमित करण्यासाठी अर्ज दाखल

पिंपरी चिंचवड शहरातील पाण्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने अवैध नळजोड नियमित करण्यासाठी घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत 1 हजार 19 जणांचे नळजोड नियमित करण्यासाठी अर्ज आले आहेत.

  • By Aparna
Updated On: Jul 18, 2022 | 03:15 PM
पिंपरी चिंचवड शहरात १ हजार १९ जणांचे नळजोड नियमित करण्यासाठी अर्ज दाखल
Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील पाण्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने अवैध नळजोड नियमित करण्यासाठी घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत 1 हजार 19 जणांचे नळजोड नियमित करण्यासाठी अर्ज आले आहेत. यामध्ये ब प्रभागातून सर्वाधिक 260, ह मधून 238 तर सर्वात कमी इ प्रभागात 56 अर्ज आले आहेत.

शहरात 5 लाख 77 हजार मिळकतींची नोद आहे. मात्र, त्या तुलनेत अधिकृत नळजोड धारकांची संख्या कमी आहे. शहरात अवैध नळजोड धारकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. चुकीच्या पद्धतीने नळजोड केल्याने पाण्याची गळती होते. तसेच, दूषित पाणीपुरवठाही होतो. याचा परिणाम विस्कळीत पाणीपुरवठ्यावर होतो. त्यासाठी महापालिकेने वेळोवेळी अवैध नळजोडाचे सर्वेक्षण केले आहे. अवैध नळजोड नियमिती करण्यासाठी सवलती जाहीर केल्या. मात्र, नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. गेल्या काही दिवसांपासून शहरात विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. तसेच पाणी पुरवठा विभागाचे उत्पन्नही अतिशय कमी आहे. त्यामुळे महापालिकेने अवैध नळजोड नियमित करण्यासाठी विशेष मोहीम घेण्यात आली.

या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळावा, याकरिता घरगुती ग्राहकांकडून केवळ अनामत आणि दंडापोटी 5 हजार रुपये आकारण्यात येणार होते. या ग्राहकांना थकीत पाणीपट्टीसह प्रतिमहिना आकारण्यात येणारे अतिरिक्त शुल्कही माफ करण्याचे धोरण आखण्यात आले होते. ग्राहकांना 30 जूनपर्यंत या सवलत योजनेचा लाभ घेण्याची मुदत होती. या योजनेची आठही क्षेत्रीय कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. मात्र, 1 हजार 19 नागरिकांनी अवैद्य नळजोड अधिकृत करण्यासाठी अर्ज केले आहेत. अवैध नळजोड अधिकृत करण्यासाठी नागरिकांचा कमी प्रतिसाद मिळाला आहे. अर्ज करण्यासाठी नागरिकांना एक महिन्याचा कालावधी मिळाला आहे.

Web Title: In pimpri chinchwad an application has been filed to regularize the water supply of 1 thousand 19 people nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2022 | 03:15 PM

Topics:  

  • maharashtra
  • PimpriChinchwad
  • Pune
  • WesternMaharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
2

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक
3

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती
4

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.