Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी मंगेशकर रुग्णालय दोषी; हृदयनाथ मंगेशकर, उषाताई मंगेशकर यांच्यासह 11 जणांवर खटला

आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालय प्रशासनाने आवश्यक वैद्यकीय उपचार देण्यात तसेच रुग्णाला वेळेत दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात कसूर केल्याचे स्पष्ट नमूद केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 04, 2026 | 10:07 AM
तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी मंगेशकर रुग्णालय दोषी; 11 जणांवर फौजदारी खटला दाखल

तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी मंगेशकर रुग्णालय दोषी; 11 जणांवर फौजदारी खटला दाखल

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : गर्भवती तनिषा भिसे यांना वेळेवर वैद्यकीय उपचार व रुग्णवाहिकेची सुविधा न दिल्याप्रकरणी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन संचलित) यांना पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दोषी ठरवले आहे. पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या नामांकित धर्मादाय रुग्णालयाविरोधात इतकी कठोर आणि निर्णायक कारवाई करण्यात आली.

संयुक्त धर्मादाय आयुक्त राजनी किरण क्षीरसागर यांनी दिलेल्या आदेशात, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालय प्रशासनाने आवश्यक वैद्यकीय उपचार देण्यात तसेच रुग्णाला वेळेत दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात कसूर केल्याचे स्पष्ट नमूद केले आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपींमध्ये मंगेशकर कुटुंबियांचा समावेश आहे. विश्वस्तांमध्ये पंडित हृदयनाथ मंगेशकर, भारती मंगेशकर, उषाताई मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, डॉ. धनंजय केळकर, डॉ. जितेंद्र क्षीरसागर, अॅड. पी. एम. खिरे, सचिन व्यवहारे, आर. पी. जोशी आणि डॉ. प्रसाद राजहंस यांचा समावेश आहे.

पैसे न भरल्याने उपचारांना उशीर

गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू मागील वर्षी एप्रिल महिन्यात झाला होता. उपचारांसाठी रुग्णालयाने १० लाख रुपयांची अनामत रक्कम मागितली. ही रक्कम न भरल्याने उपचारांना विलंब झाला आणि त्यातूनच तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. उपचार नाकारल्याच्या या गंभीर प्रकरणानंतर विधी व न्याय विभाग, मंत्रालय यांच्या निर्देशानुसार रुग्णालयाविरोधात कारवाई सुचवण्यात आली होती.

धर्मादाय आयुक्तांकडून चौकशी

संयुक्त धर्मादाय आयुक्त क्षीरसागर यांनी या प्रकरणाची स्वयंप्रेरित (सुओ मोटो) चौकशी सुरू केली. या चौकशीसाठी उपधर्मादाय आयुक्त (पुणे) डॉ. राजेश परदेशी, रुग्णालय शाखेचे अधीक्षक दीपक खराडे तसेच निरीक्षक सचिन बकाळ आणि रवींद्र गावरे यांचा समावेश असलेल्या पथकाने सखोल तपास केला. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक सचिन बकाळ यांनी रुग्णालय आणि त्याच्या ११ विश्वस्तांविरोधात फौजदारी खटला दाखल केला आहे.

हेदेखील वाचा : khopoli Crime: राजकीय वैमनस्यातून सुपारी किलिंग! मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील फरार आरोपी अटकेत; मोठा खुलासा

Web Title: In the tanisha bhise death case mangeshkar hospital has been found guilty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 10:07 AM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

पुणे जिल्हा परिषदेत विषय समित्यांचे वाटप; हुलावळे अन् नलावडे यांच्यावर ‘ही’ मोठी जबाबदारी
1

पुणे जिल्हा परिषदेत विषय समित्यांचे वाटप; हुलावळे अन् नलावडे यांच्यावर ‘ही’ मोठी जबाबदारी

Khanwadi School Case: चुकीची माहिती पसरवणे पडले महागात; शिक्षण विस्तार अधिकारी निलंबित
2

Khanwadi School Case: चुकीची माहिती पसरवणे पडले महागात; शिक्षण विस्तार अधिकारी निलंबित

निकोप स्पर्धेमुळेच पुणे परिमंडलाची कामगिरी झळकली; डॉ. भूजंग खंदारे यांच्याकडून कौतुक
3

निकोप स्पर्धेमुळेच पुणे परिमंडलाची कामगिरी झळकली; डॉ. भूजंग खंदारे यांच्याकडून कौतुक

‘इसको अब खत्म कर देंगे…’ म्हणत सिमेंटच्या गट्टूने तरुणावर जीवघेणा हल्ला; पूर्ववैमनस्यातून रात्री गाठलं अन्…
4

‘इसको अब खत्म कर देंगे…’ म्हणत सिमेंटच्या गट्टूने तरुणावर जीवघेणा हल्ला; पूर्ववैमनस्यातून रात्री गाठलं अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.