Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निकोप स्पर्धेमुळेच पुणे परिमंडलाची कामगिरी झळकली; डॉ. भूजंग खंदारे यांच्याकडून कौतुक

महावितरण पुणे परिमंडलाने सरत्या आर्थिक वर्षात २ हजार १६५ कोटी रुपये वसुली करुन उत्तम कामगिरी केली आहे. मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी विभाग व उपविभागामध्ये वसुलीसाठी लावलेल्या निकोप स्पर्धेमुळेच हे शक्य झाले

  • By प्रीति माने
Updated On: Apr 16, 2026 | 05:23 PM
Honoring of Circle, Division, and Sub-division Heads for Outstanding Performance in Mahavitaran 2025-26.

Honoring of Circle, Division, and Sub-division Heads for Outstanding Performance in Mahavitaran 2025-26.

Follow Us
Follow Us:
Pune News : पुणे : महावितरण पुणे परिमंडलाने सरत्या आर्थिक वर्षात २ हजार १६५ कोटी रुपये वसुली करुन उत्तम कामगिरी केली आहे. मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी विभाग व उपविभागामध्ये वसुलीसाठी लावलेल्या निकोप स्पर्धेमुळेच हे शक्य झाले आहे. यावेळी जे यश मिळाले आहे ते पुढील काळात टिकवून ठेवणे आवश्यक असून, एक चुकीचे वीजबिल सुद्धा आपले मापदंड बिघडवू शकते. त्यामुळे अचूक वीजबिल देणे व ग्राहकांकडून ते वेळेत वसूल करणे हे काम आपल्याला सातत्याने करावे लागेल असे मत महावितरणचे कार्यकारी संचालक डॉ. भूजंग खंदारे यांनी व्यक्त केले आहे.
रास्तापेठ येथील महावितरण परिमंडल कार्यालयात २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंडल, विभाग व उपविभागीय प्रमुखांचा बुधवारी (दि. १५) मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्य अभियंता सुनिल काकडे, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, सिंहाजीराव गायकवाड व युवराज जरग यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. खंदारे म्हणाले, ‘वीजबिल वसूल करणे कंपनीचे नाही तर माझे काम आहे, ही जाणीव प्रत्येक कर्मचाऱ्याला असली पाहिजे. ज्या पद्धतीने आपण मार्चअखेरीस काम करतो, तसेच काम संपूर्ण वर्षात केले तर मार्च मध्ये दमछाक होणार नाही.” तर मुख्य अभियंता सुनिल काकडे म्हणाले, “पुणे परिमंडलात एकूण ३ मंडल आणि १२ विभाग आहेत. यात पहिल्या येणाऱ्या आणि शेवटी राहणाऱ्या विभागात केवळ दीड टक्क्यांचा फरक आहे. हा फरक कमी करण्यासाठी आपल्याला वीजबिल वसुलीसह, अचूक बिलींगवर शंभर टक्के काम करावे लागणार आहे.”असे मत त्यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : शिरूर लोकसभा मतदारसंघातून ‘गायब’ खासदार मिसळ पार्टीत? आढळराव पाटलांच्या कार्यपद्धतीची पुन्हा चर्चा
सूत्रसंचालन उपव्यवस्थापक (विवले) संतोष भोसले यांनी तर प्रभारी सहा. महाव्यवस्थापक (विवले) प्रवीण गुंडेली यांनी प्रास्ताविक केले. वरिष्ठ व्यवस्थापक (मासं) शितल निकम यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यकारी अभियंता सतीश सरोदे, सहा. अभियंता राहूल फाये, पवन देशपांडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास परिमंडलातील सर्व कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते व अधिकारी यांची मोठ्या संख्येने उपसिथती होती.
वर्ष २०२५-२६ च्या कामगिरीत उत्कृष्ट ठरलेली कार्यालये
महावितरण पुणे परिमंडलाच्या वार्षिक पुरस्कार २०२५-२०२६ मध्ये गणेशखिंड शहर मंडळाने प्रथम क्रमांक पटकावून उत्कृष्ट मंडळाचा मान मिळवला आहे, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी तो स्विकारला. तर उत्कृष्ट विभागाच्या श्रेणीत कार्यकारी अभियंता नितीन थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर विभाग प्रथम आला असून, नगररोड विभाग- दिपक पाटील दुसऱ्या आणि पर्वती विभाग- निलेश फलके तिसऱ्या स्थानावर राहिला आहे.
हे देखील वाचा : ‘आम्ही माफिया नाही तर…’; टँकर व्यावसायिकांनी उगारला संपाचा मार्ग, कारण काय?

उपविभागांमध्ये  रास्तापेठ शहर मंडलात पेशवे पार्क व मंडई उपविभाग (उमेश कवडे व सुनिल कुरील) प्रथम, हडपसर (विष्णू पवार) द्वितीय आणि वाडिया (प्रमोदकुमार गायकवाड) तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. गणेशखिंड शहर मंडलात शिवाजीनगर उपविभागाने (अमित भरते) प्रथम, औंध उपविभागाने (अविनाश लोखंडे व उमेश करपे) द्वितीय आणि सांगवी व हिंजवडी उपविभागाने (कल्याण गिरी व सचिन पाटील) तृतीय क्रमांक मिळवला आहे. तसेच पुणे ग्रामीण मंडलात नसरापूर उपविभाग (सिध्दार्थ सोनसळे) प्रथम, तळेगाव (जयप्रकाश सागरे) द्वितीय आणि चाकण एमआयडीसी (प्रकाश शेळके) उपविभागाने तृतीय क्रमांक मिळवला.

Web Title: Honoring of circle division and sub division heads for outstanding performance in mahavitaran 2025 26

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • mahavitaran
  • pune news

संबंधित बातम्या

Hinjawadi Shivaji Nagar Metro Line 3: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो १५ जुलैला धावणार!
1

Hinjawadi Shivaji Nagar Metro Line 3: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो १५ जुलैला धावणार!

Shivajinagar ST Stand: ६ वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पासाठी शिवाजीनगर एसटी प्रशासनाचा नवा प्लॅन; आरे’च्या जागेची मागणी
2

Shivajinagar ST Stand: ६ वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पासाठी शिवाजीनगर एसटी प्रशासनाचा नवा प्लॅन; आरे’च्या जागेची मागणी

Pune Airport News: पुण्याहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला उशीर; प्रवासी ९ तास खोळंबले
3

Pune Airport News: पुण्याहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला उशीर; प्रवासी ९ तास खोळंबले

Vidhan Parishad Election 2026: सुनेत्रा पवारांचा शरद पवारांना फोन; नेमकं घडलं काय?
4

Vidhan Parishad Election 2026: सुनेत्रा पवारांचा शरद पवारांना फोन; नेमकं घडलं काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.