Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे जिल्हा परिषदेत विषय समित्यांचे वाटप; हुलावळे अन् नलावडे यांच्यावर ‘ही’ मोठी जबाबदारी

पुणे जिल्हा परिषदेतील विषय समित्यांच्या सभापतीपदांचे वाटप करण्यात आले आहे. विशेष सर्वसाधारण सभेत सहा विषय समित्यांच्या सभापतीपदांचे वाटप जाहीर केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 16, 2026 | 06:31 PM
सत्ताधाऱ्यांची चार तास कोंडी; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात ‘एकजूट’

सत्ताधाऱ्यांची चार तास कोंडी; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात ‘एकजूट’

Follow Us
Follow Us:
  • पुणे जिल्हा परिषदेत विषय समित्यांचे वाटप
  • हुलावळे अन् नलावडे यांच्यावर ‘ही’ मोठी जबाबदारी
  • विशेष सर्वसाधारण सभेत सभापतीपदांचे वाटप
पुणे : पुणे जिल्हा परिषदेतील विषय समित्यांच्या सभापतीपदांचे वाटप करण्यात आले असून, बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापतीपदी मावळ तालुक्यातील दीपाली हुलावळे यांची तर कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतीपदी वेल्हे तालुक्यातील अमोल नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी गुरुवारी विशेष सर्वसाधारण सभेत सहा विषय समित्यांच्या सभापतीपदांचे वाटप जाहीर केले.

 

उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांच्याकडे अर्थ व नियोजन तसेच शिक्षण विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काही सभापतींना प्रत्येकी दोन समित्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी इंदापूर तालुक्यातील अंकिता पाटील-ठाकरे, तर समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी हवेली तालुक्यातील जितेंद्र बडेकर यांची निवड झाली होती. तसेच अध्यक्षपदी दौंड तालुक्यातील वीरधवल जगदाळे आणि उपाध्यक्षपदी आंबेगाव तालुक्यातील विवेक वळसे-पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
गुरुवारपर्यंत बिनखात्याचे असलेल्या पदाधिकाऱ्यांना आता अधिकृतपणे विषय समित्यांचे वाटप करण्यात आले.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. इतिहासात पहिल्यांदाच महिला बांधकाम सभापती पुणे जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून (सन १९६२) आजपर्यंत बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापतीपदी कोणत्याही महिलेला संधी मिळाली नव्हती. यंदा प्रथमच दीपाली हुलावळे यांची या पदावर नियुक्ती झाल्याने त्यांनी इतिहास रचला आहे.

हे सुद्धा वाचा : फ्लॅट विकण्यास नकार दिल्याचा राग अनावर; एका बुक्कीत पत्नीचे नाक केले फ्रॅक्चर

पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

गेल्या अनेक वर्षांपासून पुणे जिल्हा परिषद ही राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा एका जिल्हा परिषदेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. दरम्यान, विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून अध्यक्षपदी कुणाला संधी मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. महत्त्वाची बाब म्हणजे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील उमेदवारांनीही घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे या पक्षातील नेत्यालाही जिल्हा परिषदेवर संधी मिळणार का, असा प्रश्न विचारला जात होता. अखेर दौंडचे वीरधवल जगदाळे अध्यक्षपदी आणि विवेक वळसे पाटील उपाध्यक्षपदी विराजमान झाले आहेत.

Web Title: Subject committees have been allocated in pune zilla parishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 06:31 PM

Topics:  

  • maharashtra
  • pune news
  • Pune Zilla Parishad

संबंधित बातम्या

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर
1

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा
2

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा
3

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा

पुण्यनगरीला प्रदूषणाचा विळखा! कोट्यवधी खर्च करून देखील समस्या कायम; शुद्ध हवा मिळणार कधी?
4

पुण्यनगरीला प्रदूषणाचा विळखा! कोट्यवधी खर्च करून देखील समस्या कायम; शुद्ध हवा मिळणार कधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.