कॉन्ट्रॅक्ट किलर अटक
रायगड पोलिसांनी आठ दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव खालिद कुरेशी (वय 23) असे आहे.कुरेशी हा पुण्यातील हडपसर भागातील सय्यदनगर येथे राहणार. पोलिसांनी त्याला पुण्यातील वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याने २० लाखांची कॉन्ट्रॅक्ट घेऊन मंगेश काळोखे यांच्या दोन मित्रांच्या साथीने हत्या केल्याची कबुली दिली आहे. मंगेश काळोखे यांची हत्या ही राजकीय वैमनस्यातूनच करण्यात आली असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र या सगळ्यात मुख्य सूत्रधार कोण याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
पोलीस तपास सुरु
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांचा या गुन्ह्यात अद्याप तरी सहभाग आढळून आलेला नाही. मात्र त्याबाबत तपास सुरू असून तो अंतिम टप्प्यात असल्याचं पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी सांगितलं. ज्यांचा या गुन्ह्यात सहभाग आढळून आला आहे त्यांना रायगड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आणखी एकजण फरार असून त्याचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिलीय.
Ans: 26 डिसेंबर रोजी सकाळी खोपोलीतील जया बार समोर त्यांच्यावर शस्त्रांनी हल्ला करून हत्या करण्यात आली.
Ans: तपासात राजकीय वैमनस्यातून सुपारी देऊन (कॉन्ट्रॅक्ट किलिंग) हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Ans: हल्लेखोरांनी सुमारे 20 लाख रुपयांची सुपारी घेतल्याची माहिती आहे.






