मुंबई – गिरणगावात मराठी उद्योजक उदय पवार (Uday Pawar) यांनी डिजीटल प्लॅटफॉर्मवर सर्व क्षेत्रातील रोजगार मिळवून देणारे एक नवीन व्यावसायिक “टिंग टाँग ऑनलाईन ॲप” तयार केले आहे. या “टिंग टाँग ऑनलाईन ॲप”चे (Ting Tong) उद्घाटन खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांच्या हस्ते पार पडले. यावेळी या कार्यक्रमाला कामगार सेनेचे अजित साळवी यांच्यासह अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना खा. सावंत यांनी सुरुवातीला बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे या तीन महान व्यक्तीने मराठी माणसाला उभ राहण्याची, स्वाभिमानाने जगण्याची ऊर्जा दिली. त्यामुळं मराठी माणसाने प्रत्येक क्षेत्रात स्वाभिमानानं उभं राहयलं पाहिजे. प्रत्येकाला स्वत:चा ग्राहक वर्ग मिळवून देण्याचे काम ‘टिंग टाँग ऑनलाईन ॲप’द्वारे होणार आहे. ज्याप्रमाणे कुठल्याही आजारावर एकच रामबाण उपाय त्याचप्रमाणे कुठल्याही कामाचा एकच मार्ग टिंग टाँग ऑनलाईन अप्लिकेशन, असे गौरवोद्गार खासदार अरविंद सावंत यांनी काढले.
उदय पवार यांचा मला अभिमान – सावंत
दरम्यान, पुढे बोलताना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, प्रत्येकाला स्वत:चा ग्राहक वर्ग मिळवून देण्याचे काम ‘टिंग टाँग ऑनलाईन ॲप’च्या माध्यमातून होणार आहे. आज मला आनंद होत आहे की, एक मराठी मुलगा ज्यानं डिजीटल प्लॅटफॉर्मवर एक नवीन व्यावसायिक ॲप तयार केलं आहे. ज्यामधून अनेक मराठी मुलांना रोजगार मिळू शकतो. कारण आज नोकऱ्यांची स्थिती काय आहे? कारखाने कसे बंद होत आहेत. याबाबत आता नव्याने सांगणे नाही. म्हणून स्वत:च्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे. मात्र स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी देखील कुठेतरी मार्ग हवा असतो. आपल्या व्यवसायाला ग्राहक वर्ग हवा असतो. आज प्रत्येकाकडे असणाऱ्या कौशल्याचं मार्केटींग कसं करायचा हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर उदय पवार यांनी दिलं आहे. तुमच्या कौशल्याचं मार्केटींग टिंग टाँग ऑनलाईन करेल. आज गिरणगावात एक मराठी मुलगा उदय पवार यांनी व्यवसायात उतरत मराठी मुलांसाठी रोजगारनिर्मिती करत आहे. काहीतरी नावीन्याचा ध्यास घेऊन व्यवसाय करत आहेत, याचा मला अभिमान वाटतोय असं खा. अरविंद सावंत म्हणाले.
आजपासून डिजीटल प्लॅटफॉर्मवर ‘उदय’ यांच्या माध्यमातून नवा ‘उदय’…
यावेळी माध्यमांनी सावंत यांना टिंग टाँग ऑनलाईन ॲपबद्दल विचारले असता, “मराठी माणसाच्या घरी समृद्धी आली पाहिजे. त्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे. त्याच बरोबर शैक्षणिक व आर्थिक उत्कर्ष देखील झाला पाहिजे. याच भावनेतून आज एक मराठी युवक उद्योग क्षेत्रात उभा राहात आहे. त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्याचे मनोधैर्य वाढवावे, याच भावनेनं आज मी या ठिकाणी आलो असल्याचेही खा. सावंत म्हणाले. नोकऱ्या सुरक्षित करण्याचे काम करता करता कामगार सेना मराठी माणसांशी जोडली गेली, असं सावंत म्हणाले. दरम्यान, उदय पवार हे उद्योजक व्यवसायात काहीतरी नवीन व आगळंवेगळं करण्याचा प्रयत्न करताहेत, त्यांच्या या नवीन व्यवसायाला उज्वल व उदंड यश प्राप्ती होवो अशा शुभेच्छा खासदार सावंत यांनी दिल्या. तसेच आजपासून डिजीटल प्लॅटफॉर्मवर ‘उदय’ यांच्या माध्यमातून नवा ‘उदय’ झाल्याचं खा. सावंत म्हणाले. दरम्यान, यावेळी बोलताना टिंग टाँग ऑनलाईनचे सर्वेसर्वा आणि मालक उदय अशोक पवार म्हणाले की, “प्रत्येक समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न या ॲपद्वारे करण्यात येईल असा विश्वास आज उदय अशोक पवार या उद्योजकांनी दिला. ज्यांच्याकडे आपलं स्वत:चं कौशल्य असेल त्यांनी त्यांनी या टिंग टाँग ऑनलाईन ॲपवर जाऊन आपली नोंदणी करावी. त्यांना शंभर टक्के रोजगार दिल्याशिवाय टिंग टाँग ऑनलाईन राहणार नाही”, असे आश्वासन आणि टिंग टाँग ऑनलाईनचे सर्वेसर्वा उदय अशोक पवार यांनी दिला.
ॲपच्या माध्यमातून सामाजिक भान जपणार
दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना उद्योजक उदय पवार म्हणाले की, डिजीटल मार्केटींगमध्ये अशा प्रकारच्या अनेक ॲप उपलब्ध आहेत. मात्र त्या संपूर्णपणे व्यवसायिक स्वरुपाच्या आहेत. आपण आपल्या या ॲपच्या माध्यमातून सामाजिक भान देखील जपलं जाणार आहे. प्रत्येकाला त्याच्या कौशल्यावर आधारीत ग्राहक वर्ग मिळायलाच हवा असा कटाक्ष आपल्या ॲपचा असेल. त्यासाठी व्यावयासिकांकडून आम्ही दिवसाला केवळ एक रुपया एवढे नाममात्र शुल्क आकाले जाणार आहे. यामुळे हा ॲप व्यावसायिकतेपासून खूप दूर असल्याचे आपल्या लक्षात येईल. भविष्यात फ्रॅन्चाईजच्या माध्यमातून या ॲपचं जाळ अधिक विस्तारित करण्याचा देखील प्रयत्न करण्यात येणार आहे. जेणेकरून अधिकाधिक लोकांना याचा फायदा होईल. माझं स्वप्न होतं की जो मध्यमवर्ग आहे जो छोटा मोठा व्यवसाय करतो. त्याला एक डिजीटल प्लॅटफॉर्म मिळावा. या छोट्या उद्योगसमुहाला एक मोठा ग्राहकवर्ग मिळावा, यासाठीच्या विचारातून या टिंग टाँग ऑनलाईनची निर्मिती झाली, असं उद्योजक उदय पवार म्हणाले. या कार्यक्रमाला आणि माझ्या प्रत्येक कार्यात माझ्या पाठिशी सदैव उभे असणारे खासदार अरविंद सावंत यांनी वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी राहिन असं उदय पवार म्हणाले.
ॲपवर व्यवसाय रजिस्टर कसा करता येणार…
आज डिजीटल प्लॅटफॉर्मवर अनेक ॲप तुम्हाला पाहयला मिळतील. मात्र व्यवसाय किंवा रोजगार उपलब्ध करुन देणार ॲप खूप कमी आहेत, एका मराठी तरुणाने नवा प्रयोग करुन डिजीटल प्लॅटफॉर्मवर “टिंग टाँग ऑनलाईन ॲप” तयार केले आहे. याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जर तुम्हाला रोजगार किंवा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही प्ले स्टोरमध्ये जाऊन टिंग टाँग ऑनलाईन ॲप डाऊनलोड करु शकता. त्यानंतर आजच आपला व्यवसाय https://play.google.com/store/apps/details?id=com.tingtongonline करु शकता, असं आवाहन उद्योजक अशोक पवार यांनी केलं आहे.