Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cabinet Decision : रेशन दुकानदारांसाठी आनंदाची बातमी, आता क्विंटल मागे १५० ऐवजी १७० रुपये मिळणार

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील रेशन दुकानदारांची मार्जिनमध्ये वाढ करण्याची मागणी अखेर मान्य झाली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 12, 2025 | 06:38 PM
रेशन दुकानदारांसाठी आनंदाची बातमी, आता क्विंटल मागे १५० ऐवजी १७० रुपये मिळणार (फोटो सौजन्य-X)

रेशन दुकानदारांसाठी आनंदाची बातमी, आता क्विंटल मागे १५० ऐवजी १७० रुपये मिळणार (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Cabinet Decision News in Marathi :  राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकारकांना अन्नधान्य आणि साखरेचे वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये क्विंटल मागे २० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे आता दुकानदारांना क्विंटलमागे वीस रुपयांची वाढ मिळाल्याने यापूर्वीच्या १५० रुपयांऐवजी १७० रुपये मार्जिन मिळणार आहे.

“१५ ॲागस्टला मांसाहारी हॅाटेल्स बंद ठेवणार का?” राजू पाटील यांचा संतप्त सवाल

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिकाधारकांना ५३ हजार ९१० रास्तभाव दुकानदारांमार्फत ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रीक पडताळणी करून अन्नधान्य, साखर व इतर वस्तुंचे वितरण करण्यात येते. या दुकानदारांना केंद्र शासनाकडून ४५ रुपये आणि राज्य शासनाकडून १०५ रुपये असे एकूण क्विंटलमागे १५० रुपये मार्जिन म्हणून दिले जात होते. या मार्जिन रकमेत वाढ कऱण्याची विनंती या दुकानदारांच्या संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानुसार या मार्जिनमध्ये क्विंटलमागे २० रुपयांची वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार क्विंटलमागे रास्त भाव दुकानदारांना १७० रुपये (१७०० रुपये प्रति मेट्रीक टन) असे मार्जिन देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे दरवर्षी सुमारे ९२ कोटी ७१ लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद केली जाणार आहे.

सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी महत्त्वाचा निर्णय

सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी उडान योजनेच्या धर्तीवर एक वर्षासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट (व्हायअबिलिटी गॅप फंडिंग- व्हीजीएफ) निधी उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्र शासनाने सामान्य नागरिकांना विमानप्रवास परवडेल यादृष्टीने उडान (रिजनल कनेक्टिव्हिटी स्किम) योजना सुरू केली आहे. सोलापूर विमानतळासाठीदेखील ही योजना लागू होणार आहेत. ही योजना लागू होईपर्यंत वर्षभरासाठी प्रति आसन ३ हजार २४० रुपये दराने (शंभर टक्के व्हिजीएफ) व्यावहारिकता तूट म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यामुळे सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवास दर कमी होण्यास मदत होणार आहे. या निर्णयानुसार सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-पुणे या हवाई मार्गासाठी स्टार एअर कंपनीस दर आसनामागे हा व्यावहारिक तूट निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरीता १७ कोटी ९७ लाख ५५ हजार २०० रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. या विमानतळासाठी उडान योजना लागू झाल्यानंतर शासनाकडून देण्यात येणारा हा निधी बंद करण्यात येईल व केंद्र शासनाच्या उडान योजनेप्रमाणे २० टक्के व्यवहारिकता तूट (व्हिजीएफ) देण्यात येणार आहे.

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्रित येण्यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट; चेन्नीथला म्हणाले, “राज ठाकरे सध्या…”

 

Web Title: Increase in margin of fair price shopkeepers in state will get rs 170 per quintal instead of rs 150

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 06:38 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

Real Estate : रिअल इस्टेट मार्केटला फटका, सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत १७% घट
1

Real Estate : रिअल इस्टेट मार्केटला फटका, सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत १७% घट

Shivsena News : दसरा मेळाव्यापूर्वी शिवसैनिकांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिला मदतीचा हात
2

Shivsena News : दसरा मेळाव्यापूर्वी शिवसैनिकांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिला मदतीचा हात

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय
3

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध
4

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.