सौजन्य फोटो - सोशल मिडीया
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. शरयू आसोलकर या आपले भाऊ वैभव कृष्णा आसोलकर (वय ४६) यांच्यासोबत काही कामानिमित्त रत्नागिरी येथे गेल्या होत्या. तेथून दोघेही कारने सावंतवाडीच्या दिशेने परतत असताना, सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांची कार कणकवलीजवळील नांदगाव ओटव फाटा परिसरात आली.
यावेळी अचानक एक गाय कारसमोर आली. या मुक्या जनावराचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट महामार्गाच्या डिव्हाइडरला जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र यादरम्यान डॉ. शरयू आसोलकर यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांचे भाऊ वैभव यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डॉ. शरयू कृष्णा आसोलकर या सावंतवाडीतील माठेवाडा येथील रहिवासी होत्या. त्या कुडाळ येथील महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. ‘पुढल्या हाका’, ‘अनवट वाटा’ यांसारख्या साहित्यकृतींसह ‘ब. बळीचा विषयी’ या पुस्तкаमुळे त्या वाचकांच्या चांगल्याच परिचयाच्या होत्या. कवयित्री आणि लेखिका म्हणून त्यांचे साहित्यविश्वात महत्त्वपूर्ण स्थान होते. त्यांच्या अचानक निधनाची बातमी समजताच सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Ans: मुंबई-गोवा महामार्गावर कणकवलीजवळ नांदगाव ओटव फाटा परिसरात हा अपघात घडला.
Ans: कारसमोर अचानक आलेली गाय वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार डिव्हाइडरला धडकली आणि हा अपघात झाला.
Ans: त्या कुडाळ येथील महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या आणि एक प्रसिद्ध कवयित्री व लेखिका म्हणून परिचित होत्या.






