Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शार्लोट लेकमध्ये पर्यटकांचा वाढता धोका; मनसेकडून संरक्षण जाळीची मागणी

माथेरानमधील शार्लोट लेक ओव्हरफ्लो झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढली असून काहींनी पाण्यात उतरण्याचा धोका पत्करल्याने अपघात घडले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 19, 2025 | 07:47 PM
शार्लोट लेकमध्ये पर्यटकांचा वाढता धोका; मनसेकडून संरक्षण जाळीची मागणी
Follow Us
Follow Us:

माथेरान शहराला पाणीपुरवठा करणारा प्रमुख जलस्रोत असलेला शार्लोट लेक मुसळधार पावसामुळे भरून ओव्हरफ्लो झाला असून, तलावाच्या सांडव्यातून बाहेर पडणारे पाणी धबधब्याच्या स्वरूपात कोसळत असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, याठिकाणी पर्यटकांकडून धोकादायक कृती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तलावाच्या सभोवती तारेच्या संरक्षण जाळीची मागणी केली आहे.

Mangal Prabhat Lodha: “महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना आता Google चे…”; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

ब्रिटिश कालीन शार्लोट लेक नेहमी जुलै महिन्याच्या सुमारास भरतो. परंतु यावर्षी जून महिन्याच्या मध्यावरच तलाव ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे सांडव्यातून बाहेर पडणारे पाणी आणि धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येथे मोठ्या प्रमाणावर येत आहेत. पावसाळ्यात या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्याच्या नादात काही हौशी पर्यटक तलावाच्या पाण्यात उतरतात, आणि ही गोष्ट प्राणघातक ठरू शकते.

या तलावात अनेक वर्षांपासून गाळ काढलेला नाही, त्यामुळे पाण्यात पाय रुतण्याचा धोका आहे. याशिवाय तलावाची खोली ५० मीटरपेक्षा अधिक असल्याने खोल पाण्यात जाणे अत्यंत धोकादायक आहे. याचाच परिणाम म्हणजे मागील आठवड्यात तिघा पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर मनसेकडून हे ठिकाण सुरक्षित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

माथेरान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष संतोष कदम यांनी यासंदर्भात मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना निवेदन दिले असून, तलावाच्या सभोवताली तारेच्या संरक्षण जाळीची मागणी केली आहे. हे संरक्षण केल्यास पर्यटक धबधब्याचा आनंद घेतील, मात्र तलावात जाण्याचा धोका टाळता येईल आणि भविष्यातील संभाव्य अपघात रोखता येतील.

कौतुकास्पद! पुणे पोलिसांमुळे मुळा-मुठा नदीत वाहून जाणाऱ्या एकाला मिळाले जीवनदान

शार्लोट लेक हे माथेरानचे पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण केंद्र आहे, मात्र त्याचे संवर्धन आणि सुरक्षेसाठी योग्य ती पावले उचलली जाणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन जाळी बसवण्याचे कार्य त्वरित हाती घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Increasing risk to tourists in charlotte lake mns demands safety net

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 07:47 PM

Topics:  

  • Matheran
  • MNS

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

MUMBAI News: मनसेच्या ‘मराठी मानाची दहीहंडी’चा जल्लोष, दिवंगत मराठी नेते अन् कलाकारांच्या आठवणींना उजाळा
2

MUMBAI News: मनसेच्या ‘मराठी मानाची दहीहंडी’चा जल्लोष, दिवंगत मराठी नेते अन् कलाकारांच्या आठवणींना उजाळा

मोदींचा फोटो हटवल्याने मुंबईत मनसे-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; शिवतीर्थ परिसरात तणावाचे वातावरण, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
3

मोदींचा फोटो हटवल्याने मुंबईत मनसे-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; शिवतीर्थ परिसरात तणावाचे वातावरण, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय
4

Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.