Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोदींचा फोटो हटवल्याने मुंबईत मनसे-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; शिवतीर्थ परिसरात तणावाचे वातावरण, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

अमित ठाकरेंच्या विरोधात भाजप युवा मोर्चाने मुंबईतील माहिममध्ये आंदोलन केले. आंदोलक शिवतीर्थाकडे जात असताना मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. पोलिसांनी काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

  • By विवेक
Updated On: Sep 01, 2026 | 05:46 PM
मोदींचा फोटो हटवल्याने मुंबईत मनसे-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

मोदींचा फोटो हटवल्याने मुंबईत मनसे-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

Follow Us
Follow Us:
  • अमित ठाकरेंच्या विरोधात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन
  • शिवतीर्थाकडे जाताना मनसे-भाजप कार्यकर्ते आमनेसामने
  • गजानन काळेंसह काही मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
 

मुंबई : मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या घटनेचे पडसाद आता मुंबईत उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाकडून मुंबईतील माहिम परिसरात आंदोलन करण्यात आले. आंदोलक शिवतीर्थाच्या दिशेने जात असताना मनसे आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेनंतर शिवतीर्थ परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. मुंबईतील विविध भागांतून मनसे कार्यकर्ते शिवतीर्थ परिसरात जमल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत मनसे नेते गजानन काळे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

अमित ठाकरेंविरोधात भाजपचे आंदोलन

पुण्यातील घटनेच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाने अमित ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन पुकारले होते. भाजप कार्यकर्ते शिवतीर्थाकडे जात असताना मनसे कार्यकर्त्यांसोबत त्यांचा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

OBC Bachao Morcha: मुंबईकडे जाणारा ‘ओबीसी बचाव मोर्चा’ पोलिसांनी रोखला; लक्ष्मण हाकेंचा ३ तास ठिय्या!

या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी आणि धक्काबुक्की झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.

नेमका वाद कशामुळे सुरू झाला?

अमित ठाकरे हे विद्यार्थ्यांच्या समस्या आणि महाविद्यालयातील सुविधांची पाहणी करण्यासाठी पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात गेले होते. यावेळी कँटिनमधील जेवणाची गुणवत्ता तसेच खेळाडूंना प्रशिक्षक उपलब्ध नसल्याच्या मुद्द्यावर त्यांनी महाविद्यालय प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केले.

याचवेळी एका विद्यार्थ्याने कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्रांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचे अमित ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर अमित ठाकरे यांनी मोदींचा फोटो हटवण्यास सांगितले. मनसे कार्यकर्त्याने हा फोटो खाली उतरवला. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात त्यावरून वाद सुरू झाला.

अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल

दरम्यान, या प्रकरणी अमित ठाकरे यांच्यासह २० ते २५ जणांविरोधात पुण्यातील चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या आवारात विनापरवानगी प्रवेश करणे, कार्यालयात प्रवेश करून फोटो हटवणे आणि घोषणाबाजी करत गोंधळ घातल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Maharashtra Politics: ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का? १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा बड्या नेत्याचा दावा

या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असतानाच मुंबईत झालेल्या आंदोलनामुळे मनसे आणि भाजपमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात या प्रकरणावरून दोन्ही पक्षांकडून आणखी राजकीय प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

Web Title: Mumbai news mns bjp workers clash amith thackeray protest shiv tirth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • amit thackeray
  • MNS
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Sunday 1996 Marathi Movie Trailer Released:  प्रत्येक उत्तरातून उभा राहणार नवा प्रश्न! ‘संडे १९९६’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित
1

Sunday 1996 Marathi Movie Trailer Released: प्रत्येक उत्तरातून उभा राहणार नवा प्रश्न! ‘संडे १९९६’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

मुंबईत रक्ताचा तुटवडा? केईएम रुग्णालयात रक्त आणि पीआरबीसीसाठी नातेवाइकांची धावपळ
2

मुंबईत रक्ताचा तुटवडा? केईएम रुग्णालयात रक्त आणि पीआरबीसीसाठी नातेवाइकांची धावपळ

दिवाळीत ‘लालपरी’ थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, परिवहन मंत्री काय म्हणाले?
3

दिवाळीत ‘लालपरी’ थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, परिवहन मंत्री काय म्हणाले?

Mumbai News: प्रकाशातील अदृश्य बदल आता टिपणार ग्राफीन! आयआयटी मुंबईच्या संशोधनातून अचूक मापनाची नवी दिशा
4

Mumbai News: प्रकाशातील अदृश्य बदल आता टिपणार ग्राफीन! आयआयटी मुंबईच्या संशोधनातून अचूक मापनाची नवी दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.