Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय

Matheran News: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरान शहरातील अनेक रस्त्यांवरील पथदिवे बंद असल्याने रात्री येणाऱ्या पर्यटकांना अंधारातून वाट काढावी लागत आहे. विशेषतः दस्तुरी नाका ते बाजारपेठ आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 01, 2026 | 01:15 PM
पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय

पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय

Follow Us
Follow Us:
  • दस्तुरी नाका ते माथेरान शहर रस्त्यावर अंधार
  • बंद पथदिव्यांकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष?
  • माथेरानमध्ये पर्यटकांना अंधारातून काढावी लागतेय वाट
  • पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह
Matheran News: राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये अनेक रस्त्यांवरील पथदिवे बंद पडल्याने रात्रीच्या वेळी शहरातील रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. वर्षभर पर्यटकांची वर्दळ असलेल्या माथेरानमध्ये पथदिव्यांची ही अवस्था असल्याने पर्यटकांना अंधारातून वाट काढत हॉटेल किंवा इच्छित स्थळी जावे लागत आहे. या परिस्थितीबाबत माथेरान नगरपरिषदेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे. (Matheran News)

दस्तुरी नाक्यापासूनच पर्यटकांना अंधाराचा सामना

माथेरानमध्ये वाहनांना प्रवेश नसल्यामुळे दस्तुरी नाका हा पर्यटकांसाठी महत्त्वाचा प्रवेशबिंदू आहे. कारमधून उतरल्यानंतर अनेक पर्यटक येथून पुढे पायी किंवा अन्य स्थानिक वाहतूक साधनांच्या मदतीने शहरात जातात. मात्र दस्तुरी नाका ते माथेरान शहराकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावरील अनेक स्ट्रीट लाईट बंद असल्याने रात्री येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत आहे.

Matheran News: माथेरान नगरपरिषदेला आली जाग! शार्लोट लेकमधील गाळ काढण्यासाठी लावले मजूर

दस्तुरीपासून बाजारपेठेकडे आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज रोड तसेच महात्मा गांधी रस्त्याच्या परिसरात अनेक पथदिवे बंद असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी पर्यटकांना अंधारातून प्रवास करावा लागत आहे.

अहिल्यादेवी होळकर चौकापर्यंतच्या मार्गावरही समस्या

दस्तुरी नाका ते माथेरानमधील अहिल्यादेवी होळकर चौक या मार्गावरही पथदिव्यांची समस्या निर्माण झाली आहे. या भागातील पथदिव्यांची वायर अज्ञात व्यक्तीने कापल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अधिकृतपणे नेमके कारण स्पष्ट होणे आवश्यक आहे. पर्यटक २४ तासांतील कोणत्याही वेळी माथेरानमध्ये दाखल होत असतात. अशावेळी रात्री उशिरा येणाऱ्या पर्यटकांसाठी रस्त्यावरील पुरेशी प्रकाशव्यवस्था अत्यंत महत्त्वाची ठरते.

सुरक्षित पर्यटनस्थळाच्या प्रतिमेवर परिणाम?

माथेरान हे पर्यटकांसाठी सुरक्षित आणि वाहनमुक्त पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. वर्षातील बाराही महिने येथे पर्यटकांची वर्दळ असते. शनिवार-रविवार, सार्वजनिक सुट्ट्या आणि पर्यटन हंगामात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र शहराच्या प्रमुख प्रवेशमार्गावरच पथदिवे बंद असल्यास रात्रीच्या वेळी पायी चालणाऱ्या पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे बंद पथदिव्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

देखभाल-दुरुस्तीसाठी ठेकेदार, तरीही दिवे बंद

माथेरानमधील पथदिव्यांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. ठेकेदाराने रात्रीच्या वेळी विविध भागांची पाहणी करून कोणत्या ठिकाणी पथदिवे बंद आहेत, याची माहिती घेणे आणि आवश्यक दुरुस्ती करणे अपेक्षित असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी पथदिवे बंद असूनही ते पूर्ववत होत नसल्याने संबंधित ठेकेदाराच्या कामावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नगरपरिषदेने तातडीने लक्ष देण्याची मागणी

पर्यटनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या माथेरानसारख्या शहरात मूलभूत सुविधांची योग्य देखभाल होणे आवश्यक आहे. विशेषतः पर्यटकांच्या सुरक्षिततेशी थेट संबंध असलेल्या पथदिव्यांची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी नागरिक आणि पर्यटकांकडून होत आहे. दस्तुरी नाका ते बाजारपेठ आणि शहरातील प्रमुख मार्गांवरील बंद पथदिवे कधी सुरू होणार, तसेच पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी नियुक्त ठेकेदाराकडून नियमित पाहणी केली जाते का, याकडे आता लक्ष लागले आहे.

रेकॉर्डब्रेक पावसाचा माथेरानला फटका, शारलोट लेक ते सनसेट पॉईंट रस्ते खराब,पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नगरपरिषदेचा महत्त्वाचा निर्णय

Web Title: Matheran news street lights not working tourists face dark roads municipal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • maharashtra
  • Matheran
  • tourism

संबंधित बातम्या

आंबेगाव तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई; ‘हंडा मोर्चा’ काढून प्रशासनाला धरले धारेवर
1

आंबेगाव तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई; ‘हंडा मोर्चा’ काढून प्रशासनाला धरले धारेवर

FDA News: महाराष्ट्रात औषध विक्रेत्यांवर FDA चा मोठा बडगा! दोन आठवड्यांत २९ परवाने रद्द, ७१ निलंबित
2

FDA News: महाराष्ट्रात औषध विक्रेत्यांवर FDA चा मोठा बडगा! दोन आठवड्यांत २९ परवाने रद्द, ७१ निलंबित

रावेतमध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला नागरिकांचा कडाडून विरोध; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
3

रावेतमध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला नागरिकांचा कडाडून विरोध; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

नोव्हेंबरमध्ये फिरण्याचा प्लॅन करताय? भारतातील ही ८ ठिकाणं नक्की एक्सप्लोर करा!
4

नोव्हेंबरमध्ये फिरण्याचा प्लॅन करताय? भारतातील ही ८ ठिकाणं नक्की एक्सप्लोर करा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.