मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; इंदापुरात काँग्रेस आक्रमक
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंदापूर तालुका काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन
एसआयआर (SIR) प्रक्रियेत वगळलेल्या नावांची गावनिहाय व केंद्रनिहाय पडताळणी करण्याची मागणी
एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी काँग्रेस पक्षाचा आक्रमक पवित्रा
Indapur Congress Tehsildar Memorandum SIR Process : विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एस .आय.आर प्रक्रियेवरून काँग्रेस आक्रमक झाली असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. एकही पात्र मतदार वगळला जाता कामा नये; मतदार यादी पारदर्शक आणि निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष झाली पाहिजे, अशी ठाम मागणी करत इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष निवास शेळके यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेदरम्यान पात्र नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळली गेल्याच्या तक्रारींची सखोल चौकशी करून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
देशभर काँग्रेसकडून एस .आय.आर प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर इंदापूर तालुका काँग्रेसनेही मतदारांच्या हक्काचा मुद्दा उपस्थित करत स्थानिक पातळीवर SIR प्रक्रियेची तपासणी करण्याची मागणी केली.
यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस निरीक्षक अरविंद दोरगे पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
SIR प्रक्रियेदरम्यान इंदापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये पात्र नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळली गेल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे SIR प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल पद्धतीने तपासण्याची आवश्यकता असल्याचे काँग्रेसने तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिले.
चला तयारी सुरू करा! ICC World Cup 2027 चे वेळापत्रक आयसीसी जाहीर करणार; तारीख ठेवा नोट करून
एस .आय.आर पूर्वीची आणि एस .आय.आर नंतरची मतदार यादी गावनिहाय, मतदान केंद्रनिहाय तसेच मतदारसंघनिहाय तपासण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या नागरिकांची संख्या, त्यांची नावे आणि नावे वगळण्यामागील कारणे यांची पारदर्शकपणे पडताळणी करून संबंधित माहिती नागरिकांना उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.
नाव वगळण्यात आलेल्या नागरिकांना त्यांच्या नावाबाबतची माहिती, वगळण्याचे कारण आणि आवश्यक असल्यास नाव पुनर्स्थापित करण्याची प्रक्रिया स्पष्टपणे समजावून सांगावी तसेच त्यांना आवश्यक ती संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
इंदापूर तालुक्यातील मतदारसंख्येत एस .आय.आर प्रक्रियेदरम्यान झालेल्या बदलांची गावनिहाय आणि मतदान केंद्रनिहाय अधिकृत माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी करण्यात आली. एस .आय.आर प्रक्रियेत निष्काळजीपणा, नियमभंग किंवा अनियमितता आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी भूमिकाही काँग्रेसच्या वतीने मांडण्यात आली.






