फोटो सौजन्य सोशल मिडिया
या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्य अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. शाळांमधील सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, हात धुण्याची व्यवस्था, मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन, घन व ओला कचरा व्यवस्थापन, शाळेची देखभाल, विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती, हरित उपक्रम आणि दिव्यांगांसाठी अनुकूल सुविधा या निकषांच्या आधारे तपासणी केली जात आहे.
ऑनलाइन नोंदविलेली माहिती आणि प्रत्यक्ष शाळेतील सुविधांची पडताळणी करून गुणांकन निश्चित केले जाणार आहे. मूल्यांकन अहवाल, उपलब्ध सुविधा, छायाचित्रे, संबंधित पुरावे आणि शाळांचे अभिलेख तपासल्यानंतर पात्र शाळांची निवड केली जाईल. जिल्हास्तरावर किमान तीन स्टार मानांकन आणि संबंधित गटात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या शाळांचा विचार केला जाणार आहे. मात्र, राज्यस्तरीय नामांकनासाठी केवळ चार आणि पाच स्टार मानांकन प्राप्त शाळाच पात्र ठरणार आहेत.
Buldhana: २४०० हेक्टरवर चारा लागवडीचे नियोजन, ८ प्रकल्पांवर चारा लागवड; पशुसंवर्धन विभागचा पुढाकार
“स्वच्छ एवं हरित विद्यालय रेटिंग मूल्यांकन आणि पडताळणी पारदर्शक पद्धतीने केली जात आहे. शाळांमधील स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्यविषयक सुविधा आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना प्राधान्य दिले जात आहे. गुणवत्तापूर्ण सुविधा असलेल्या पात्र शाळांची निकषांनुसार निवड करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नामांकन पाठविण्यात येईल, या उपक्रमातून जिल्ह्यातील शाळांचा दर्जा उंचावण्यास मदत होईल. असे शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग अश्विनी लाठकर यांनी सांगितले.
जिल्हास्तरीय मूल्यांकन, पडताळणी आणि मानांकनाची प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर निवडलेल्या आठ शाळांचे राज्यस्तरीय नामांकन १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन पोर्टलवर सादर केले जाणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.






