Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंडिया फूड अँड बेव्हरेज अवॉर्ड्स २०२२ चे आयोजन; शेफ संजीव कपूर आणि शेफ रणवीर ब्रार सन्मानित

इंडिया फूड अँड बेव्हरेज अवॉर्ड्स २०२२ (India Food and Beverage Awards 2022) सोहळ्यात शेफ संजीव कपूर (Chef Sanjeev Kapoor) आणि शेफ रणवीर ब्रार (Chef Ranveer Brar) यांना पीपल्स चॉइस- क्युलिनरी आयकन्स ऑफ द इयर (People's Choice - Culinary Icons of the Year) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • By Vivek Bhor
Updated On: Jul 15, 2022 | 07:17 PM
Winners-of-the-India-Food-&-Beverage-Awards-2022

Winners-of-the-India-Food-&-Beverage-Awards-2022

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गोदरेज विक्रोळी कुकिना (Godrej Vikhroli Cucina) हा गोदरेज इंडस्ट्रीजचा (Godrej Industries) खाद्यपदार्थ व पाककला क्षेत्राला समर्पित प्लॅटफॉर्म आणि फूड ब्लॉगर्स असोसिएशन ऑफ इंडिया (Food Bloggers Association of India) यांनी इंडिया फूड अँड बेव्हरेज अवॉर्ड्स २०२२ (IFBA) सोहळ्याचे आयोजन मुंबईतील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह (Jio World Drive, Mumbai) येथील नाइन डाइन (Nine Dine) येथे केले.

इंडिया फूड अँड बेव्हरेज अवॉर्ड्स २०२२ (India Food and Beverage Awards 2022) सोहळ्यात शेफ संजीव कपूर (Chef Sanjeev Kapoor) आणि शेफ रणवीर ब्रार (Chef Ranveer Brar) यांना पीपल्स चॉइस- क्युलिनरी आयकन्स ऑफ द इयर (People’s Choice – Culinary Icons of the Year) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. खाद्यपदार्थ व पाककला क्षेत्राला दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल दोन्ही तज्ज्ञांचा सन्मान करण्यात आला.

योर फूड क्लबचे संस्थापक व काँटेण्ट क्रिएटर शेफ संज्योत कीर यांना सोशल मीडिया स्टार ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात आला. कर्ली टेल्सच्या संस्थापक कामिया जानी यांनी इन्स्टाग्राम स्टार ऑफ द इयर आणि ट्रॅव्हल यूट्युबर ऑफ द इयर असे दोन पुरस्कार प्राप्त केले.

याशिवाय आयएफबीए २०२२मध्ये आणखी ५८ विजेत्यांची घोषणा करण्यात आली. या यादीमध्ये भारतभरातील शेफ्स, रेस्टोरंट्स, काँटेण्ट क्रिएटर्स, ब्लॉगर्स, माध्यम संस्था, समुदाय व टीव्ही व्यक्तिमत्वांचा समावेश आहे. खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात या वर्षामध्ये प्रशंसनीय काम करणाऱ्यांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला.

या सर्वांना ७ प्रमुख पुरस्कार विभागांद्वारे मान्यता देण्यात आली- फेसबुक, इन्स्टाग्राम, ब्लॉग, यूट्यूब, मीडिया, हॉस्पिटॅलिटी आणि प्रख्यात शेफ्स. याशिवाय या पुरस्कारांचे वर्गीकरण २९ उपविभागांमध्ये करण्यात आले.

गोदरेज इंडस्ट्र्जी लिमिटेड आणि सहयोगी कंपन्यांच्या कॉर्पोरेट ब्रॅण्ड अँड कम्युनिकेशन्स विभागाचे प्रमुख तसेच उपाध्यक्ष सुजीत पाटील या उपक्रमाबद्दल म्हणाले, “विक्रोळी क्युकिना हा गोदरेजचा अशा प्रकारचा एकमेव ब्रॅण्ड ॲग्नोस्टिक प्लॅटफॉर्म आहे. यावर अन्नपदार्थांच्या क्षेत्रातील ब्रॅण्ड्स, शेफ्स, फूड ब्लॉगर्स, इन्फ्लुएन्सर्स व सर्व खवय्ये संवाद साधतात व कल्पनांचे आदानप्रदान करतात. इंडिया फूड अँड बेव्हरेज अवॉर्ड्स २०२२साठी, फूड ब्लॉगर्स असोसिएशन ऑफ इंडियाशी सहयोगाची संधी मिळाली, याचा आम्हाला खूप आनंद वाटतो. फूड या क्षेत्रात झालेल्या सर्वोत्तम कामाची हा प्लॅटफॉर्म दखल घेतो. उद्योगक्षेत्रातील सर्वोत्तम प्रतिभेची अशी दखल घेतली गेल्यास आणखी चांगले काम होऊ शकेल आणि या महान उद्योगक्षेत्राचा दर्जा आणखी वाढेल असे आम्हाला वाटते. विजेत्यांचा फूड अँड बेव्हरेज परिसंस्थेतील पुढील प्रवास उत्तम व्हावा अशी शुभेच्छा आम्ही देतो.”

एफबीएआयचे सहसंस्थापक समीर मलकानी पुरस्कारांबद्दल म्हणाले, “नवीन प्रतिभा शोधून काढणे व उद्योजकांना प्रोत्साहन देणे हे कायमच #आयएफबीएच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक राहिले आहे. भारतभरातून येणाऱ्या प्रवेशिकांच्या संख्येत झालेली वाढ ही अशा मान्यतांमध्ये असलेला रस व आवश्यकता दाखवते. मी सर्व सहभागींचा, संबंधितांचा व परीक्षकांचा आभारी आहे. त्यांनी आमच्या या उपक्रमाला खूप चांगले पाठबळ दिले आणि आमचे को-होस्ट गोदरेज इंडस्ट्रीजचा तर विशेष उल्लेख केला पाहिजे. गोदरेज व त्यांचे ब्रॅण्ड्स नेहमीच #आयएफबीएचे मूल्य वाढवतात.”

Web Title: India food and beverage awards 2022 chef sanjeev kapoor and chef ranveer brar honored nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2022 | 07:12 PM

Topics:  

  • Chef Ranveer Brar
  • Godrej Industries
  • Mumbai

संबंधित बातम्या

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल
1

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
2

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा
3

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल
4

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.