
भारतात शिक्षणापेक्षा गुटख्यावर अधिक खर्च! सरकारी सर्वेक्षणातील वास्तव; तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीत मोठी वाढ
भारताचा खरा चेहरा गावांमध्ये दिसतो, असे नेहमी सांगितले जाते. मात्र, केंद्र सरकारच्या ताज्या उपभोग खर्च सर्वेक्षणातून ग्रामीण भागातील एक गंभीर आणि चिंताजनक चित्र समोर आले आहे. ग्रामीण भारतात शिक्षणावर होणाऱ्या खचपिक्षा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांवर अधिक पैसा खर्च केला जात असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. घरगुती उपभोग आणि खर्च सर्वेक्षणनुसार (एचसीईएस) ग्रामीण कुटुंबे त्यांच्या एकूण खर्चापैकी केवळ २.५% खर्च शिक्षणावर करतात, तर तब्बल ४% खर्च तंबाखूजन्य पदार्थांवर, विशेषतः गुटख्यावर केला जातो. १ फेब्रुवारीपासून तंबाखूच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळी हे सर्वेक्षण समोर आले आहे. गेल्या दशकभरात तंबाखूच्या वापरात सातत्याने वाढ होत असल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.(फोटो सौजन्य – istock)
२०११-१२ ते २०२३-२४ या कालावधीत ग्रामीण भागात प्रतिव्यक्ती तंबाखूवरील खर्चात ५८% वाढ झाली असून शहरी भागात ही वाढ ७७% इतकी आहे. सध्या ग्रामीण भागात दरमहा प्रतिव्यक्ती खर्चाच्या सुमारे १.५% आणि शहरी भागात १% खर्च तंबाखूवर होत आहे.ग्रामीण भारतात तंबाखू वापरणाऱ्या कुटुंबांची संख्या २०११-१२ मध्ये ९.९ कोटी (५९.३%) होती, ती २०२३-२४ मध्ये १३.३ कोटीवर (६८.६%) पोहोचली आहे. म्हणजेच अवघ्या दशकभरात ३३% वाढ झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम
शहरी भागात ही वाढ आणखी वेगवान असून तंबाखू वापरणारी कुटुंबे २.८ कोटीवरून ४.७ कोटींवर पोहोचली आहेत. शहरी भागातील तंबाखू वापरणाऱ्या कुटुंबांचा वाटा ३४.९% वरून ४५.६% झाला आहे.सर्वेक्षणानुसार तंबाखूचा वापर आता केवळ काही विशिष्ट प्रांतांपुरता किंवा सामाजिक गटांपुरता मर्यादित राहिलेला नाही. ग्रामीण भागात गुटखा आणि पानतंबाखूचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, तर शहरी भागात सिगारेटचा वापर वेगाने वाढत असून गुटखाही झपाट्याने पसरत आहे.३० % पेक्षा जास्त राष्ट्रीय ग्रामीण सरासरी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड आणि राजस्थानात आहेत.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.