Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: ‘एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील…चारित्र्यावर आरोप, मानसिक छळ; MDS च्या विद्यार्थिनीची आत्महत्या, काय नेमकं प्रकरण?

मुंबईतील एंटॉप हिल येथे 24 वर्षीय एमडीएस विद्यार्थिनी स्तुती सोनावणे हिने प्रियकराच्या सततच्या संशय आणि मानसिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळावरून 6 पानांची सुसाईड नोट सापडली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 11, 2026 | 10:16 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • एंटॉप हिल येथे 24 वर्षीय एमडीएस विद्यार्थिनी स्तुती सोनावणे हिची गळफास घेऊन आत्महत्या.
  • प्रियकर मोहम्मद फौझीलकडून चारित्र्यावर संशय व मानसिक छळ होत असल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख.
  • घटनास्थळावरून 6 पानांची सुसाईड नोट जप्त; पोलिसांकडून पुढील तपास सुरू.
मुंबई: मुंबई येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव स्तुती सोनावणे असे आहे. तिने आत्महत्या करणाऱ्याआधी ६ पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली. ही सुसुईड नोट खळबळजनक आहे. तिच्या प्रियकराने चारीत्यवर केलेले गलिच्छ आरोप आणि सततच्या संशयाला कंटाळून तिने आत्महत्या केली. नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घ्या…

काय घडलं नेमकं?

स्तुती सोनवणे (२४ वर्षीय) नवी मुंबईतील एका डेंटल कॉलेजमध्ये एमडीएसचे शिक्षण घेत होती. ती आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत एंटॉप हिल परिसरात राहत होती. तिचे मोहम्मद फौझील नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पोलिसांना घटनास्थळावरून 6 पानांची सुसाईड नोट सापडली असून, त्यात तिने आपल्या प्रेमप्रकरणाबाबत खळबळजनक अनुभव लिहिले.

Paper Leak: धक्कादायक! पुण्यात दहावीचा गणिताचा पेपर लीक, टेलिग्राम ग्रुपवर तीन दिवस आधीच प्रश्नपत्रिका व्हायरल; गुन्हा दाखल

सुरुवातीला या दोघांचे संबंध चांगले होते, मात्र कालांतराने फौझील तिच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. ती तिच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ आरोप करत होते. ज्यामुळे ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती.

श्रद्धा वालकर केसचा उल्लेख

तिने सुसाईड नोटमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडाचा उल्लेख केला आहे. स्तुतीचे मित्रमैत्रिणी तिला मस्करीत म्हणायचे की, “एक दिवस तू आम्हाला फ्रिजमध्ये सापडशील”. सुसाईड नोटमध्ये या वाक्याचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. प्रियकरासोबतच्या नात्यात तिला किती असुरक्षित वाटत होते, हे या वाक्यावरून स्पष्ट होत आहे.

मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे स्तुती तिच्या खोलीत होती, मात्र सकाळी ११ वाजेपर्यंत ती बाहेर न आल्याने कुटुंबियांना संशय आला. त्यांनी वारंवार वाजवूनही प्रतिसाद मिळाला नाही, अखेर दरवाजा तोडून पहिले असता तिने नायलॉनच्या ओढणीने गळफास घेतल्याचे दिसले. तिला तातडीने सायन रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

पुढील तपास सुरु

एंटॉप हिल पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनास्थळावरून जप्त केलेली ६ पानांची सुसाईड नोट हा या प्रकरणातील मुख्य पुरावा मानला जात आहे. पोलीस आता या सुसाईड नोटच्या आधारे मोहम्मद फौझीलची चौकशी करत असून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Nashik Crime: फेसबुकवरून मैत्री, क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; नाशिकच्या तरुणाकडून 53 लाख लंपास

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या करणारी तरुणी कोण होती?

    Ans: स्तुती सोनावणे नावाची 24 वर्षीय तरुणी असून ती डेंटल कॉलेजमध्ये एमडीएसचे शिक्षण घेत होती.

  • Que: आत्महत्येचे कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: प्रियकराच्या सततच्या संशय, चारित्र्यावर आरोप आणि मानसिक छळामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती.

  • Que: पोलिसांना घटनास्थळावर काय सापडले?

    Ans: घटनास्थळावरून 6 पानांची सुसाईड नोट सापडली असून त्यावरून पोलिस तपास करत आहेत.

Web Title: Mumbai crime one day youll be found in a fridgeallegations regarding character mental harassment mds student commits suicidewhat exactly is the case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
1

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
2

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
3

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.