Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवडची कन्या प्रियंका इंगळेच्या नेतृत्वात भारताने जिंकला खो-खो विश्वचषक, सर्व स्तरातून कौतुक

पिंपरी-चिंचवडमधील वडमुखवाडी येथील श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयाची माजी विद्यार्थिनी आणि भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळे हिने आपल्या नेतृत्वगुणांच्या जोरावर भारतीय संघाला खो-खो विश्वचषक जिंकून दिला.

  • By युवराज भगत
Updated On: Jan 21, 2025 | 04:17 PM
पिंपरी-चिंचवडची कन्या प्रियंका इंगळेच्या नेतृत्वात भारताने जिंकला खो-खो विश्वचषक, सर्व स्तरातून कौतुक

पिंपरी-चिंचवडची कन्या प्रियंका इंगळेच्या नेतृत्वात भारताने जिंकला खो-खो विश्वचषक, सर्व स्तरातून कौतुक

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखाली भारताने नेपाळ संघाचा ३८ गुणांच्या फरकाने पराभव करीत विश्वचषकावर आपले नाव कोरले. तळेगावच्या इंद्रायणी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी असलेल्या प्रियंका इंगळे हिचे व आणि भारतीय महिला खो-खो संघाचे इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे आधारस्तंभ माजी आमदार कृष्णराव भेगडे, संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांनी अभिनंदन केले.

वडमुखवाडीत लहानपण
प्रियंका इंगळे हिचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील असून ती पुण्याच्या पिंपरी-चिंचवड येथील वडमुखवाडी येथे लहानाची मोठी झाली. तिने प्राथमिक शिक्षण श्री सयाजीनाथ महाराज विद्यालय, वडमुखवाडी येथे पूर्ण केले, जिथे तिला खो-खो खेळात करिअर करण्याची संधी मिळाली. वयाच्या बाराव्या वर्षापासून प्रियंकाने राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. सातवीत असतानाच तिने तिच्या कारकिर्दीतील पहिली राष्ट्रीय स्पर्धा खेळली होती.

प्रियंका हिने पंधरा वर्षांच्या खेळाडू आयुष्यात तब्बल २३ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. २०२३ मध्ये तिने चौथ्या आशियाई खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, तर २०२२ मध्ये तिला राष्ट्रीय स्तरावरील राणी लक्ष्मीबाई पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

प्रियंकाच्या या विजयामुळे इंद्रायणी महाविद्यालय आणि मावळ तालुक्याची मान उंचावली आहे. संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे म्हणाले, ‘प्रियंका इंगळेने आपल्या कर्तृत्वाने महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे. महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी नेहमीच क्रीडा प्रकारात पोषक वातावरण निर्माण करते, ज्यामुळे भविष्यातही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू घडतील.’ प्रियंका इंगळेच्या यशामुळे संपूर्ण तळेगाव दाभाडे आणि पिंपरी चिंचवड परिसरात आनंदाचे वातावरण असून तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Web Title: India wins kho kho world cup 2025 under leadership of priyanka ingle daughter of pimpri chinchwad praised from all levels

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 04:17 PM

Topics:  

  • Kho Kho World Cup 2025
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवडमध्ये टिप्परचा कहर, एकाच दिवशी तीन अपघात; एकाचा मृत्यू
1

पिंपरी-चिंचवडमध्ये टिप्परचा कहर, एकाच दिवशी तीन अपघात; एकाचा मृत्यू

मोठ्या प्रकल्पांपेक्षा मूलभूत सुविधांना प्राधान्य द्या; खासदार श्रीरंग बारणे यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश
2

मोठ्या प्रकल्पांपेक्षा मूलभूत सुविधांना प्राधान्य द्या; खासदार श्रीरंग बारणे यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश

अखेर ठरलं! पिंपरीतील डेअरी फार्म पूल कधी खुला होणार? महत्त्वाची माहिती समोर
3

अखेर ठरलं! पिंपरीतील डेअरी फार्म पूल कधी खुला होणार? महत्त्वाची माहिती समोर

भामा-आसखेड जलवाहिनीचे काम पुन्हा वादात, दोषी ठेकेदारालाच पुन्हा ‘पायघड्या’? प्रशासकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा
4

भामा-आसखेड जलवाहिनीचे काम पुन्हा वादात, दोषी ठेकेदारालाच पुन्हा ‘पायघड्या’? प्रशासकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.