Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऊसाला हमीभाव देण्यापेक्षा साखरेला हमीभाव द्या; ना कर्जमाफीची गरज भासेल, ना साखर दराची चिंता राहील

देशात सर्वाधिक साखर निर्मिती महाराष्ट्रात होते. आज राज्यात जवळपास 103 सहकारी आणि 107 खाजगी साखर कारखाने साखर निर्मिती करत आहेत. तर जगात ब्राझील देश सर्वाधिक साखर निर्मिती करतो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 23, 2026 | 01:09 PM
Instead of fixing a guaranteed price for sugarcane, fix a guaranteed price for sugar.

Instead of fixing a guaranteed price for sugarcane, fix a guaranteed price for sugar.

Follow Us
Follow Us:

सातारा / संजय कदम : जगात साखर उत्पादन करण्यात भारत देशाचा दुसरा क्रमांक लागतो. मग आज देशाला 10 लाख टन साखर आयात करण्याची वेळ का आली? याच उत्तर शोधण गरजेचं आहे. देशात प्रतिवर्षी ऊसाची एफआरपी ही साखर उताऱ्यावर निश्चित केली जाते. मात्र, उत्पादन झालेल्या साखर दरावर सरकारच कधीच नियोजन राहत नाही. त्यामुळे कारखाने अडचणीत येत आहेत.

साखरेचा हमी भाव निश्चित केला तर देशातील ऊस उत्पादक शेतकरी सुखी होईल. त्यामुळे सर्व समस्या सुटतील. मुळात देशात तयार होणारी साखर ही कोणी महाग केली त्याला शोधावं लागेल. आज आपल्या देशात मधुमेही रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मग साखर वापर कोण करत आहे तर आज औद्योगिक कामासाठी 60 ते 65 टक्के साखर जाते. तर घरगुती वापर केवळ 30 ते 35 टक्के साखर लागत आहे. मग मात्र दोघांनाही विक्री एकाच दराने का होते यासाठी साखरेचा दर दोघांना वेगवेगळा हवा. मुळात साखर दर हा 50 रूपयांपेक्षा कमी होऊ नये तर ऊस उत्पादक शेतकऱ्याला टनाला किमान 5 हजार दर निश्चित मिळेल आणि शेतकरी सुखी होईल.

मागील दोन वर्षातील परिस्थिती पाहता देशात आणि राज्यात साखर उत्पादन कमी झाले. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. 2023-24 या गाळप हंगामात देशात 299 लाख मे टन साखर उत्पादन झाले तर मागील वर्षी च्या हंगामात 264 लाख मे टन उत्पन्न झाले म्हणजे मागील वर्षी 35 लाख टन साखर उत्पादन कमी झाले, हीच परिस्थिती राज्याची झाली. 2023-24 मध्ये राज्यात 110 लाख मे टन साखरचे उत्पादन झाले तर मागील वर्षी 81लाख मे टन साखर उत्पादन झाले म्हणजे साधारण 29 लाख टन साखर कमी झाले. ही आकडेवारी असली तरी देशात आणि राज्यात सध्या इथेनॉल निर्मितीसाठी साखर जात आहे.

अनेक कारखाने साखर दराच्या अस्थिर भूमिकेमुळे पक्की साखर इथेनॉलसाठी वापरत आहेत. त्यामुळे आज जगाला साखर निर्यात करणाऱ्या आपल्या देशाला साखर आयात करण्याची वेळ आली.

देशात सर्वाधिक साखर निर्मिती महाराष्ट्रात होते. आज राज्यात जवळपास 103 सहकारी आणि 107 खाजगी साखर कारखाने साखर निर्मिती करत आहेत. तर जगात ब्राझील देश सर्वाधिक साखर निर्मिती करतो. मात्र, दोन्ही ठिकाणी परिस्थिती भिन्न आहे. आपला साखर उद्योग हा 100 टक्के सरकारच्या नियंत्रणात नाही त्यामुळे अडचणी वाढत आहेत. ऊसाची एफआरपी ही साखरेवर केल्यास कारखाने आणि शेतकरी दोघेही सुखी होतील.

सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या UPSC परीक्षेचा संपूर्ण पॅटर्न आणि पेपर्सचे गणित!

Web Title: Instead of fixing a guaranteed price for sugarcane fix a guaranteed price for sugar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • Satara News
  • Sugar Market

संबंधित बातम्या

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक
1

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक

सभापतींच्या गावातीलच नागरिक बांधकाम विभागाला वैतागले; अधिकारी-ठेकेदारांना गावात फिरकू न देण्याचा संतप्त नागरिकांचा इशारा
2

सभापतींच्या गावातीलच नागरिक बांधकाम विभागाला वैतागले; अधिकारी-ठेकेदारांना गावात फिरकू न देण्याचा संतप्त नागरिकांचा इशारा

‘खासदारकीपेक्षा जनसेवा मोठी, जिल्हा बँकेत पदासाठी नव्हे तर…’; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

‘खासदारकीपेक्षा जनसेवा मोठी, जिल्हा बँकेत पदासाठी नव्हे तर…’; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

Satara News: खण आळीतील रस्ता होणार मोकळा, अतिक्रमणे हटविण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम! मुदत संपताच पालिकेची कारवाई
4

Satara News: खण आळीतील रस्ता होणार मोकळा, अतिक्रमणे हटविण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम! मुदत संपताच पालिकेची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.