Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घोडावत विद्यापीठात आंतरराष्ट्रीय कार्यशाळा; उत्तम प्रशिक्षण मिळावे या हेतूने आयोजन

घोडावत विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन या विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा १७ ते २१ ऑक्टोबर दरम्यान ‘प्रशिक्षकांना प्रशिक्षित करा’ या उप विषयावर आधारित आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 17, 2022 | 02:23 PM
घोडावत विद्यापीठात आंतरराष्ट्रीय कार्यशाळा; उत्तम प्रशिक्षण मिळावे या हेतूने आयोजन
Follow Us
Close
Follow Us:

शिरोली : डिझास्टर रेसिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर या थीमवर ब्रिटिश कौन्सिलच्या जागतिक सहभागी स्तरावर देण्यात येणाऱ्या अनुदानाचा भाग म्हणून टीसाईड विद्यापीठ युके, संजय घोडावत विद्यापीठ, एस. आर. एम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी तमिळनाडू आणि अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घोडावत विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन या विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा १७ ते २१ ऑक्टोबर दरम्यान ‘प्रशिक्षकांना प्रशिक्षित करा’ या उप विषयावर आधारित आहे.

आपत्ती व्यवस्थापनामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना, प्रशिक्षकांना उत्तम प्रशिक्षण मिळावे या हेतूने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून एम.एस.सी डीझास्टर ममॅनेजमेंट विषयाचा अभ्यासक्रम सहभागी विद्यापीठाच्या शिक्षकांकडून आणि विद्यार्थ्यांना आलेल्या अनुभवावर, प्रशिक्षकांच्या सल्ल्याने तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सहभागी विद्यापीठाच्या निवडक विद्यार्थ्यांना टीसाईड विद्यापीठ युके आणि भारतात एम. एस. सी डीझास्टर मॅनेजमेंट या विषयाचे शिक्षण घेण्याची आणि १२ आठवड्यांची इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. याचा सर्वतोपरी खर्च विद्यापीठाचा असणार आहे. ज्याच्यामध्ये प्रवास खर्च, राहण्याची सोय आहे. संजय घोडावत विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षणासाठी निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना ब्रिटिश कौन्सिल कडून देण्यात येणाऱ्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. यामुळे भारत आणि युके यांच्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची देवाणघेवाण सुरु होईल. हा अभ्याक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्र, राज्य, जिल्हा आपत्कालीन विभाग, स्वयंसेवी संस्था अशा ठिकाणी नोकरी करण्याची संधी प्राप्त होईल.

प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थी आणि प्रशिक्षक कोल्हापूर आणि परिसरातील ज्या भागात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते तिथे भेटी देणार आहेत. त्याचबरोबर कोल्हापुरातील वारसा स्थळांना भेट देऊन आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास काय करता येईल या विषयी, यावेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. देश विदेशातील ६० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, प्रशिक्षक या कार्यशाळेत सहभाग घेणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण पाटील यांनी दिली आहे.

या कार्यशाळेचे उद्घाटन १७ ऑक्टोबर रोजी घोडावत विद्यापीठात होणार आहे. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी राहुल रेखावार तर अध्यक्ष म्हणून विश्वस्त विनायक भोसले उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर टीसाईड विद्यापीठचे आंतरराष्ट्रीय सहयोगी अधिव्याख्याते डॉ.सिमॉन लॅँच आणि डॉ. केविन थॉमस या उद्घाटन समारंभास अतिथी प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यशाळेत घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण पाटील, डिझाईन सल्लागार दीपंकर भट्टाचार्य, एस. आर. एम. विद्यापीठाचे डॉ. विघ्नेश के. एस, महाराष्ट्र राज्याचे माजी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक आणि माजी जिल्हाधिकारी दौलत देसाई, सायबर सिक्युरिटी विषयातील तज्ज्ञ आशुतोष कापसे, शास्त्रज्ञ एस.डी.पवार, व्हाईट वॉटर आर्किटेक्ट चे प्राचार्य आर्कि. दर्शन इंदानी, सी.डी.आर.आय व्यवस्थापन शाखेचे अविनाश व्यंकटा हे सर्व व्याख्याते सहभागीतांना प्रशिक्षण देणार आहेत. या कार्यशाळेस संस्थेचे चेअरमन संजय घोडावत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: International workshop at ghodawat university organized for better training nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2022 | 02:23 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • kolhapur
  • Shiroli

संबंधित बातम्या

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…
1

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले
2

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द
3

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द

Uddhav Thackeray Live : “शिवाजी पार्कवर चिखल, याला कारण कमळाबाई…”, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
4

Uddhav Thackeray Live : “शिवाजी पार्कवर चिखल, याला कारण कमळाबाई…”, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.