Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निष्क्रिय  मोदी, शिंदे सरकारच्या कारभाराची पोलखोल करा ; आमदार प्रणिती शिंदे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन 

काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यालयात न बसता तळागाळातील जनतेत जाऊन मोदी सरकारच्या नऊ वर्षे आणि महाराष्ट्रातील खोके आणि ईडीच्या भीतीने आलेल्या शिंदे सरकारच्या निषि्क्रय कारभाराचा पोलखोल करा असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.

  • By Aparna
Updated On: Jul 17, 2023 | 05:29 PM
'देवेंद्र फडणवीस म्हणजे ईव्हीएम सीएम, महाराष्ट्र...'; प्रणिती शिंदेंची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

'देवेंद्र फडणवीस म्हणजे ईव्हीएम सीएम, महाराष्ट्र...'; प्रणिती शिंदेंची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

Follow Us
Close
Follow Us:

सोलापुर : काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यालयात न बसता तळागाळातील जनतेत जाऊन मोदी सरकारच्या नऊ वर्षे आणि महाराष्ट्रातील खोके आणि ईडीच्या भीतीने आलेल्या शिंदे सरकारच्या निषि्क्रय कारभाराचा पोलखोल करा असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.

शहर काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष जुबेर कुरेशी आणि सोलापूर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते व शहर अध्यक्ष चेतन नरोटे, मान्यवर नेतेमंडळी यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापुर येथे करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमास शहर अध्यक्ष चेतन नरोटे, संयोजक अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष जुबेर कुरेशी, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, मा.नगरसेवक बाबा मिस्त्री, रियाज हुंडेक़री, तौफ़ीक़ हत्तूरे, विनोद भोसले, अय्यूबभाई कुरेशी, मकबूल मोहोळकर, जिल्हा अध्यक्ष वसीम पठाण, शौक़त पठाण, शकील मौलवी, रुस्तुम कंपली, प्रवक्ते अशोक निंबर्गी, प्रदेश चिटणीस किसन मेकाले, अँड मनीष गडदे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अंबादास बाबा करगुळे, मध्य युवक अध्यक्ष वाहिद बिजापुरे, याकूब मंगलगिरी, मुबीन सय्यद, अहमद रायली, मोमीन सय्यद, हेमाताई चिंचोळकर, जाबीर अल्लोळी सुभाष वाघमारे, नागनाथ शावने अादी मान्यवर व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कॉंग्रेसची विचारधारा कोणी संपवू शकणार नाही
आमदार शिंदे म्हणाल्या, गोरगरीबांचा वाली फक्त काँग्रेस पक्ष असून काँग्रेसची विचारधारा कोणीच संपवू शकणार नाही. मोदी आणि राज्यातील तिघाड़ी सरकार लोकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी भ्रष्टाचारी लोकांना गोळा करून सत्ता मिळविण्यात व्यस्त आहेत. लोक महागाई, बेरोजगारी, गॅस सिलेंडरचे दरवाढ, अन्नधान्य, भाजीपालाच्या दरवाढीने त्रस्त आहेत.

जनतेत जाऊन नागरिकांच्या अडचणी समजून घ्या
आमदार शिंदे म्हणाल्या, जनता आमच्यासाठी सर्वस्व असून राहुल गांधी ज्याप्रमाणे भारत जोडोच्या माध्यमातून जनतेत जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या त्याचप्रमाणे लोकांच्या हितासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जाऊन काम करावे. काँग्रेस पक्षासाठी आशादायक वातावरण असून अनेक जण काँग्रेस पक्षात येण्यास इच्छुक आहेत असे म्हणाले. तसेच चेतन नरोटे, जुबेर कुरेशी, प्रमिला तुपलवंडे, यांनाही त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Web Title: Investigate the dysfunctional modi shinde governments governance mla praniti shindes appeal to workers nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2023 | 05:29 PM

Topics:  

  • maharashtra
  • maharashtra news
  • MLA Praniti Shinde
  • praniti shinde
  • Solapur News

संबंधित बातम्या

समाजाच्या गरजा समजून घेतल्याशिवाय उद्योजकता शक्य नाही; एमकेसीएलचे संस्थापक विवेक सावंत यांचे मत
1

समाजाच्या गरजा समजून घेतल्याशिवाय उद्योजकता शक्य नाही; एमकेसीएलचे संस्थापक विवेक सावंत यांचे मत

सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनासाठी लोटला जनसागर; विविध पक्ष संघटना व संस्थांच्या वतीने अभिवादन
2

सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनासाठी लोटला जनसागर; विविध पक्ष संघटना व संस्थांच्या वतीने अभिवादन

Ahilyanagar News: शिक्षकांचा ‘टीईटी’ सक्तीला जोरदार विरोध! शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा
3

Ahilyanagar News: शिक्षकांचा ‘टीईटी’ सक्तीला जोरदार विरोध! शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा

महाराष्ट्र आणि जमर्नीतील ‘या’ राज्यामध्ये करार! परदेशात शिक्षण घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
4

महाराष्ट्र आणि जमर्नीतील ‘या’ राज्यामध्ये करार! परदेशात शिक्षण घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.