Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद पवारांना मोठा धक्का! ‘हा’ बडा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

दौंडचे माजी आमदार व पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 25, 2025 | 05:53 PM
शरद पवारांना मोठा धक्का! ‘हा’ बडा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

शरद पवारांना मोठा धक्का! ‘हा’ बडा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Follow Us
Follow Us:

केडगाव : दौंडचे माजी आमदार व पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ते आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे थोरात यांचा पक्षप्रवेश शरद पवार गटाला धक्का देणारा ठरणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून रमेश थोरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर ते अधिकृत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून उमेदवारी घेऊन त्यांनी आमदार राहुल कुल यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीमध्ये रमेश थोरात यांचा पराभव झाला. सध्या ते अजित पवारांबरोबर जाणार असल्याचे बोलले जात होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी जिल्ह्यात घडत आहेत. रमेश थोरात शरद पवार गटाशी फारकत घेणार असल्याने खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठीही हा मोठा धक्का आहे.

रमेश थोरात यांचे दौंड तालुक्यातील विविध संस्थांवर वर्चस्व आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवारांना खंबीर साथ देणारे रमेश थोरात यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळणार नसल्याचे लक्षात घेऊन शरद पवार गटाला साथ दिली होती. दरम्यान दौंड तालुक्यातील वरवंड या ठिकाणी १ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणाऱ्या जाहीर सभेत रमेश थोरात आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान या प्रवेशासंदर्भात थोरात यांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठका देखील सुरू आहेत. रमेश थोरात यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये होणारा प्रवेश महाविकास आघाडीला देखील धक्कादायक मानला जात आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे, पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या दोन नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपची बारामती लोकसभा मतदारसंघांमधील ताकद वाढली आहे. त्यातच रमेश थोरात देखील राष्ट्रवादीत जाणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची विशेषता महाविकास आघाडीची मोठी पीछेहाट बारामती लोकसभा मतदारसंघात होणार आहे. दरम्यान दिनांक एक ऑगस्ट रोजी होणाऱ्या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: It has been reported that ramesh thorat from daund will join ajit pawars party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2025 | 05:53 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • Daund News
  • NCP Sharad Pawar

संबंधित बातम्या

मुलीच्या लग्नावर पहिल्यांदाच स्पष्ट बोलल्या सुप्रिया सुळे; आरएसएस संबंधित कुटुंबीयांबरोबर कसे जुळले सूत?
1

मुलीच्या लग्नावर पहिल्यांदाच स्पष्ट बोलल्या सुप्रिया सुळे; आरएसएस संबंधित कुटुंबीयांबरोबर कसे जुळले सूत?

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका
2

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका

शरद पवार गटाच्या खासदारांची प्रधानमंत्री मोदींसोबत २० मिनिटे चर्चा; अमोल कोल्हेंनी भेटीचा सगळा तपशीलच सांगितला…
3

शरद पवार गटाच्या खासदारांची प्रधानमंत्री मोदींसोबत २० मिनिटे चर्चा; अमोल कोल्हेंनी भेटीचा सगळा तपशीलच सांगितला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.