Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जनतेच्या समस्या सोडवणे हे नगरसेवकाचे कर्तव्य : शिवेंद्रसिंहराजे

नगरसेवक हा नागरिकांचा सेवक असतो. प्रभाग, वॉर्डमधील समस्या सोडवून नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा पुरविणे आणि नागरिकांच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवणे हे प्रत्येक नगरसेवकाचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडण्यात नगर विकास आघाडीचे नगरसेवक नेहमीच कटिबद्ध राहिले आहेत, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 18, 2022 | 03:22 PM
जनतेच्या समस्या सोडवणे हे नगरसेवकाचे कर्तव्य : शिवेंद्रसिंहराजे
Follow Us
Follow Us:

सातारा : नगरसेवक हा नागरिकांचा सेवक असतो. प्रभाग, वॉर्डमधील समस्या सोडवून नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा पुरविणे आणि नागरिकांच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवणे हे प्रत्येक नगरसेवकाचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडण्यात नगर विकास आघाडीचे नगरसेवक नेहमीच कटिबद्ध राहिले आहेत, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी सांगितले.

कोरोना, अतिवृष्टी असो किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो शिवेंद्रसिंहराजे आपत्तीग्रस्त, गरजू लोकांच्या मदतीसाठी नेहमीच अग्रेसर असतात. कोरोना काळात कोरोना केअर सेंटर उभारणीपासून, मोफत अन्नधान्य वाटप, रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून देणे आदींसाठी शिवेंद्रसिंहराजे नेहमीच तत्पर होते. आता सातारा- जावली मतदारसंघातील जनतेला पावसाळ्यात दिलासा मिळावा म्हणून शिवेंद्रसिंहराजे यांच्यामार्फत ५० हजार छत्र्यांचे मोफत वाटप करण्यात येत आहे.

शहरातील प्रभाग क्र. १५ मध्ये आज या उपक्रमाचा शुभारंभ शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक अमोल मोहिते, आशा पंडित, भालचंद्र निकम, पिंटू जगदाळे, किशोर पंडित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शहरातील विविध भागामध्ये गोर- गरीब आणि गरजू लोकांना छत्र्यांचे वाटप करण्यात येत आहे. सातारा आणि जावली तालुक्यातही छत्री वाटप सुरु झाले असून, शिवेंद्रसिंहराजेंच्या मार्फत ५० हजार छत्र्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे अमोल मोहिते यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, नगर विकास आघाडीने सातारकरांच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय दिला असून आघाडीचा प्रत्येक नगरसेवक नागरिकांचा सेवक म्हणूनच काम करत असतो, याचा मला अभिमान आहे. यापुढेही सातारकरांच्या समस्या सोडवण्यासाठी आघाडीतील प्रत्येक नगरसेवक अविरत कार्यरत राहील, असा शब्द शिवेंद्रसिंहराजे यांनी यानिमित्ताने दिला.

Web Title: It is the duty of a corporator to solve the problems of the people says shivendra raje bhosale nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2022 | 03:22 PM

Topics:  

  • maharashtra
  • Shivendra Raje Bhosale

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.