Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राम सातपुतेंनी मदतीसाठी 50 कोटींची ऑफर दिली होती; जयसिंह मोहिते पाटलांचा गौप्यस्फोट

विधानसभा निवडणुकीवेळी भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी त्यांना आतून मदत करण्यासाठी ५० कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट जयसिंह मोहिते पाटील यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 01, 2025 | 04:20 PM
राम सातपुतेंनी मदतीसाठी 50 कोटींची ऑफर दिली होती; जयसिंह मोहिते पाटलांचा गौप्यस्फोट

राम सातपुतेंनी मदतीसाठी 50 कोटींची ऑफर दिली होती; जयसिंह मोहिते पाटलांचा गौप्यस्फोट

Follow Us
Follow Us:
  • राम सातपुतेंनी 50 कोटींची ऑफर दिली होती
  • देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही गेले होते
  • जयसिंह मोहिते पाटलांचा गौप्यस्फोट
अकलूज : अकलूज येथील प्रचाराच्या सांगता सभेतून जयसिंह मोहिते पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. माळशिरस विधानसभा निवडणुकीवेळी भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी त्यांना आतून मदत करण्यासाठी ३५ कोटी रुपयांची ऑफर आपल्याला दिली होती. अगदी मला घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही गेले होते. मात्र आपण एकदा दिलेला शब्द बदलत नाही हे मी सांगून आलो होतो. निवडणुकीला चार दिवस उरले असताना ही ऑफर ५० कोटी रुपयांपर्यंत गेली होती, असा गौप्यस्फोट मोहिते पाटील यांनी केला आहे.

 

लोकसभा निवडणुकीच्या वेळी धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकर आपल्याकडे आले होते. यावेळी जानकर यांना निवडून आणण्याचा शब्द आपण दिला होता आणि तो पाळण्यासाठी आपण राम सातपुते यांची ऑफर धुडकावली, पण शब्द मोडला नाही, असे मोहिते पाटील यांनी यांनी स्पष्ट केले.

जयसिंह माेहिते पाटील म्हणाले, राम सातपुते यांना सोलापूर लोकसभेला उभा राहू नका, पराभूत व्हाल, असे स्पष्ट मी सांगितले होते. सोलापूर लोकसभा मतदारसंघात विजयसिंह माेहिते पाटील यांना मानणारे ८० हजारापेक्षा जास्त मतदार आहेत. तुम्ही त्यांना दगा देऊन तिकडे गेल्यास पराभव नक्की होईल. असे सांगूनही सातपुते यांनी ऐकले नाही. विधानसभेतला पुन्हा माळशिरसमध्ये निवडणूक लढविण्यासाठी ते आले असता उभे राहू नका, पुन्हा पराभव हाेईल, असे सांगितले होते. गेल्या वेळी नुसत्या अकलूजकरांनी तुम्हाला १९ हजाराचे लीड मिळवून दिले आणि त्यावेळी जानकर यांचा फक्त २६०० मताने पराभव झाला. याची आठवण जयसिंह मोहिते पाटील यांनी करून दिली.

अकलूजकर बाजीप्रभूप्रमाणे

मोहिते पाटलांचे अकलूजकरांवर आणि अकलूजकरांचे मोहिते पाटलांवर खूप प्रेम आहे. जेव्हा अकलूजकर अडचणीत असतात तेव्हा मोहिते पाटील धावून येतात आणि जेव्हा मोहिते पाटील अडचणीत असतात तेव्हा सर्व अकलूजकर बाजीप्रभूप्रमाणे समोर उभे राहतात, अशा शब्दात अकलूजकरांशी असलेले नाते जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह सर्व २६ उमेदवार मोठ्या फरकाने बाजी मारतील, असा दावाही त्यांनी केला.

Web Title: Jaisingh mohite patil has made a big revelation in a meeting in akluj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 04:19 PM

Topics:  

  • Akluj
  • BJP
  • Ram Satpute

संबंधित बातम्या

Chandrshekhar Bavankule on CJP Protest: CJPचे आंदोलन केवळ नौटंकी; बावनकुळेंनी उडवली खिल्ली
1

Chandrshekhar Bavankule on CJP Protest: CJPचे आंदोलन केवळ नौटंकी; बावनकुळेंनी उडवली खिल्ली

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित
2

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित

‘दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवले…’ भाजप नेता पुन्हा बरळला, CJP आंदोलनावरून भाजपकडून जहरी टीका
3

‘दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवले…’ भाजप नेता पुन्हा बरळला, CJP आंदोलनावरून भाजपकडून जहरी टीका

आता थांबायचं नाय…! आंदोलकांवरील लाठीचार्ज पाहून Sonam Wangchuk यांचा मोठा निर्णय; 23 व्या दिवशी उपोषण सुरु ठेवण्याचा मेसेज
4

आता थांबायचं नाय…! आंदोलकांवरील लाठीचार्ज पाहून Sonam Wangchuk यांचा मोठा निर्णय; 23 व्या दिवशी उपोषण सुरु ठेवण्याचा मेसेज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.